अपघातांची माहिती देण्यास नकार
By admin | Published: November 12, 2014 01:40 AM2014-11-12T01:40:55+5:302014-11-12T01:40:55+5:30
राज्यातील महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत असतानाच त्याची माहिती वर्तमानपत्रद्वारे देऊन जनजागृतीचे काम करणा:या पत्रकारांना आता माहिती न देण्याचा पवित्र महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.
Next
मुंबई : राज्यातील महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होत असतानाच त्याची माहिती वर्तमानपत्रद्वारे देऊन जनजागृतीचे काम करणा:या पत्रकारांना आता माहिती न देण्याचा पवित्र महामार्ग पोलिसांनी घेतला आहे. पत्रकार वैयक्तिक वापरासाठी माहिती घेत असल्याचे कारण महामार्ग पोलिसांनी पुढे केले आहे.
राज्यात मोठय़ा प्रमाणात रस्ते अपघात होत असून, दारू पिऊन वाहन चालवणो, ओव्हरटेक करणो, अतिवेगाने वाहन चालविणो इत्यादी कारणो त्यास कारणीभूत ठरत आहेत. याबाबत वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी पत्रकारांच्या सहकार्याने अपघातांची माहिती प्रसिद्ध करत जनजागृती केली आहे. तसेच महामार्ग पोलिसांकडून प्रत्येक वर्षी राबवण्यात येणा:या रस्ता सुरक्षा मोहिमेलाही वर्तमानपत्रतून वेळोवेळी प्रसिद्धी देण्याचे काम केले आहे. मात्र आता महामार्ग पोलिसांकडून आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, रस्ते अपघातांची माहिती पत्रकारांना न देण्याचाच निर्णय घेतला आहे.
2013 आणि 2014मध्ये झालेल्या रस्ते अपघातांची माहिती मुंबईतील महामार्ग पोलिसांच्या मुख्यालयाकडे मागण्यात आली असता त्यासाठी सविस्तर अर्ज करावा लागणार असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला सांगण्यात आले. त्यानुसार सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी राज्यातील रस्ते अपघातांची माहिती मिळावी आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या महामार्गावरील अपघातांचीही आकडेवारी मिळावी अशी विनंती करणारा अर्ज केला असता ही माहिती मंगळवारी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. दुस:या दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास या माहितीसाठी महामार्ग पोलिसांच्या मुख्यालयात प्रतिनिधी गेले असता तब्बल दोन तास बसवून ठेवण्यात आले आणि त्यानंतरही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई) सुरेंद्रनाथ पांडेय यांनी ही माहिती न देण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे रिडर डी.एम. बनसोडे यांनी सांगितले. पत्रकारांकडून वैयक्तिक वापर केला जाईल, असे कारण देत हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सध्या ठाण्याचे पोलीस आयुक्त असलेले विजय कांबळे यांनीही यापूर्वी महामार्ग पोलिसांचा कार्यभार सांभाळला होता. रस्ते अपघात कमी करण्यासाठी कांबळे यांच्याकडून बरेच प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. जनजागृतीचे काम करण्यात येत असल्याने अपघातांची किंवा अन्य माहिती पत्रकारांना वेळोवेळी उपलब्ध केली. मात्र आता अर्जाच्या जाळ्यात अडकवून माहिती देण्यास महामार्ग पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे.