उलगडले मातीशी ‘नाते’!

By Admin | Published: December 12, 2014 12:56 AM2014-12-12T00:56:43+5:302014-12-12T00:56:43+5:30

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने डॉ. हसमुख सांकालिया या पुरातत्त्व तज्ज्ञांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुरातत्त्व दिनाची सुरुवात केली.

'Relation' with the unfolded soil! | उलगडले मातीशी ‘नाते’!

उलगडले मातीशी ‘नाते’!

googlenewsNext
मुंबई : भूतकाळात जाऊन माणसाचे मातीशी असलेले नाते उलगडण्याची संधी पुरातत्त्व दिनाच्या प्रदर्शनामुळे मुंबईकरांना मिळाली. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाने डॉ. हसमुख सांकालिया या पुरातत्त्व तज्ज्ञांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पुरातत्त्व दिनाची सुरुवात केली. 
पुरातत्त्व दिनाच्या निमित्ताने उत्खननाची प्रत्यक्ष संधी देणा:या उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत मुंबईकरांनी अनोखा अनुभव मिळवला. उत्खनन करण्याची शास्त्रीय पद्धत, निरीक्षण कसे करायचे हे समजावून मातीमधून स्वत: वस्तू शोधण्याची संधी सर्वाना  मिळत होती. त्यामुळे पुरातत्त्व तज्ज्ञ नेमके काय काम करतात, याची मुंबईकरांना जवळून ओळख पटली आणि या शास्त्रविषयीचे कुतूहलही वाढले.
विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्या आवारात बहि:शाल शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या चांदोर, पेंडुर येथील उत्खननाविषयीचा आढावा मांडण्यात आला होता. या उत्खनन उपक्रमात प्राचार्याच्या मार्गदर्शनासह मिळालेले अवशेष, हत्यारे, दगड या वेळी मांडण्यात आले होते. या ठिकाणी महाराष्ट्र व इतर ठिकाणी उत्खनन करताना मिळालेली काही दुर्मीळ शिल्पेही प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यात सूर्यदेव, नृत्य करणारा गणोश, शिवा, सरस्वती अशा वेगवेगळ्या शिल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनात काही खासगी संग्राहकांनीही आपल्या नाण्यांचे प्रदर्शन मांडले होते. (प्रतिनिधी)
 
च्आदिवासी धातूकला, दगडातून हत्यारे कोरणो, जीवाश्म जतन, मूर्तीशास्त्र, मातीकाम, नाणोशास्त्र, जुन्या हत्यारांचा संग्रह, संवर्धनाच्या निरनिराळ्या पद्धती यांच्याविषयीचे वैशिष्टय़पूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 
च्शिवाय, या वेळी दफनविधी करणा:या प्राचीन पद्धतींचा आढावा घेण्यात आला. त्याकरिता दफन करण्याच्या विविध पद्धती प्रतीकात्मक पद्धतीने आवारात साकारण्यात आल्या होत्या. मोडी, ब्राrी या प्राचीन लिपींमधून नाव लिहून घेण्यासाठी विद्याथ्र्यांनी गर्दी केली होती. 

 

Web Title: 'Relation' with the unfolded soil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.