झोपडट्टीतील रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे शिथील करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 04:04 PM2020-12-05T16:04:04+5:302020-12-05T16:04:23+5:30

slum dwellers to get houses : झोपडपट्टीवासियांना  एसआरए योजनेतून घरे मिळाली पाहिजे

Relax rules and regulations for slum dwellers to get houses sooner | झोपडट्टीतील रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे शिथील करा 

झोपडट्टीतील रहिवाशांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे शिथील करा 

Next


मुंबई : एसआरए ट्रान्स्फर व शुल्का संबंधी तसेच पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांना  एसआरए योजनेतून घरे मिळाली पाहिजे ही आपली जुनी मागणी असून यासाठी नियम व कायदे करण्यासाठी संशोधन केले पाहिजे. गरिबांना स्वतः चे हक्का चे घर आणि पुढे जर परिस्थिती चांगली झाली तर घर विकून मोठ्या घरात जाण्याचे स्वप्न ही सुरळीत साकार झाले पाहिजे अशी भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असे स्वप्न आहे. मुंबई महानगरात झोपडपट्टी व चाळीत राहणारा एक मोठा वर्ग आहे.त्यामुळे झोपपट्टीतील रहिवाश्यांना घरे लवकर मिळण्यासाठी नियम व कायदे शिथील करा अशी आग्रही मागणी  खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केली आहे.  एसआरए  अंतर्गत बांधलेल्या  लाभार्थी सदनिकांच्या नियमांमध्ये शिथीलता आणण्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांच्या घोषणेचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्वागत केले आहे.

एसआरएची सदनिकेचा कालावधी  दहा वर्षा ऐवजी पांच वर्षांचा करावा यासाठी खासदार शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. आपल्या या मागणीला प्रतिसाद दिल्यामुळे लाभार्थी सदनिकांच्या नियमांमध्ये शिथीलता आणण्याच्या मंत्रीमहोदयांच्या घोषणेमुळे त्यामुळे लाभार्थी आता विकू शकतील अशी माहिती त्यांनी दिली. खासदार शेट्टी यांनी मंत्री महोदयांच्या धन्यवाद देत फेस बुक लाईव्हद्वारे काही सूचना ही केल्या आहे. 

 आयुष्यभर कष्ट करून बांधलेले घर किंवा विकत घेतलेले घर एका गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्कानुसार पूर्णपणे तसेच कमीत कमी अडचणी टाळत मिळाला पाहिजे यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआर ए मधल्या लाभार्थी करिता पांच वर्षात घर विकू शकतात अशी तरतूद केली होती परंतू काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नाही. 

Web Title: Relax rules and regulations for slum dwellers to get houses sooner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.