२०० शाळांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:02 AM2018-02-23T03:02:24+5:302018-02-23T03:02:27+5:30

मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

Relaxed 200 schools! | २०० शाळांना दिलासा!

२०० शाळांना दिलासा!

Next

मुंबई : मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. बारावीची परीक्षा, दहावीच्या तोंडी, प्रॅक्टिकल व अंतर्गत मूल्यमापनाची कामे शाळांमध्ये सुरू असल्याने २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित चर्चासत्र पुढे ढकलण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. याबाबत शिक्षक परिषदेने
चर्चासत्र पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, याबाबत अनेक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षक परिषदेजवल नाराजी व्यक्त केली होती. म्हणूनच शिक्षक परिषदेने हे चर्चासत्र स्थगित करण्याची तक्रार प्राधिकरणाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी शिक्षक परिषदेने मुंबई विभाग प्रादेशिक विद्या प्राधिकरणकडे हे चर्चासत्र स्थगित करण्याची मागणी केली. त्यासाठी विद्या प्राधिकरणाचे राज्याचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी चर्चाही केली. त्यात हे चर्चासत्र पुढे ढकलण्याची मागणी करून पाठपुरावा केला.
त्यावर संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रादेशिक विद्या प्राधिकरणाला चर्चासत्र स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चर्चासत्र पुढे ढकलल्याचा फायदा मुंबईतील २०० दोनशे शाळांमधील शिक्षकांना होणार असून संबंधित शाळांमधील कामकाज आता सुरळीत चालणार आहे. संबंधित निर्णयाने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

Web Title: Relaxed 200 schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.