बोरिवली येथील आरएमसी प्लांटच्या कामाला स्थगिती देऊन नागरिकांची त्रासातून मुक्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:25+5:302021-03-08T04:06:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरिवली (प) लिंकरोड येथील सी. टी.एस. क्र. १४९० वर ना-विकास क्षेत्रात , निवासी क्षेत्राच्या ...

Release the citizens from trouble by postponing the work of RMC plant at Borivali | बोरिवली येथील आरएमसी प्लांटच्या कामाला स्थगिती देऊन नागरिकांची त्रासातून मुक्तता करा

बोरिवली येथील आरएमसी प्लांटच्या कामाला स्थगिती देऊन नागरिकांची त्रासातून मुक्तता करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बोरिवली (प) लिंकरोड येथील सी. टी.एस. क्र. १४९० वर ना-विकास क्षेत्रात , निवासी क्षेत्राच्या जवळ, शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्रस्तावित आरएमसी प्लांटमुळे या परिसरातील सुमारे २५०० नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी सभागृहात केली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सभोवतालच्या निवासी क्षेत्रात नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता १०० मीटर अंतरावर बफर झोन उभारण्यात आलेला नाही. या प्लांटवर धूर हवेत न पसरण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याची कोणतीही व्यवस्था आढळून येत नाही. सभोवताली झाडे व भिंत उभारण्यात आलेली नाही. हा आरएमसी प्लांट सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांना श्वसन विकार, खोकला, सर्दी इ. आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती आमदार पोतनीस यांनी दिली.

--- ------------------ ----- ---

Web Title: Release the citizens from trouble by postponing the work of RMC plant at Borivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.