आठ फुट अजगराची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:54 PM2020-06-27T18:54:28+5:302020-06-27T18:55:23+5:30

कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अजगर आढळला.

Release the eight-foot dragon | आठ फुट अजगराची सुटका

आठ फुट अजगराची सुटका

Next

 

मुंबई : कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अजगर आढळला. पॉज आणि अम्मा केअर फाउंडेशनचे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांना ही माहिती मिळताच शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी यास ताब्यात घेतले. संतोष बावकर यांनी पॉजच्या मदत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधत याबाबत माहिती दिली होती. अजगराची सुटका करून वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर राहुल मेश्राम यांच्याकडे नेण्यात आले. याची माहिती वनविभागाला देऊन निसर्गाच्या सानिध्यात त्यास सोडण्यात आले, अशी माहिती पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी दिली. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रमेश चव्हाण यांचा पॉजला फोन आला. त्यांनी एका फुट अजगर निदर्शनास आल्याची माहिती दिली. त्यास पॉजने ताब्यात घेतले. तर मुलुंड पश्चिम अमर नगर येथे एका घरावरती तस्कर साप आढळला.  स्थानिक रहिवासी विशाल सुरडकर यांनी पॉजला याबाबत माहिती दिली. तेथील स्थानिक स्वयंसेवकानी तिन्ही सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

अजगर बिनविषारी साप आहे. पालापाचोळ्याचे ढीग करून मादी त्यात नऊ ते दहा अंडी घालते व शरीराचे वेटोळे करून ती अंडी उबवते. अंडी नऊ ते दहा सेंटिमीटर लांबीची व सुमारे १०० ग्रॅम वजनाची असते. नव्वद ते शंभर दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. पिलांची लांबी ३० सेंटीमीटर इतकी असते. अजगराचे प्रमुख खाद्य उंदीर घूस, बेडूक व इतर सस्तन मोठे प्राणी आहे. अजगराची अधिकतम लांबी अंदाजे २४ फुट इतकी वाढते. तस्कर साप बिनविषारी आहे. हा साप मुंबईमध्ये दुर्मिळ आहे. या सापाची सरासरी लांबी सहा फूट इतकी होते. याचे प्रमुख खाद्य इतर पक्ष्यांची अंडी, पक्षी व गरज लागता उंदीरही खाद्य आहे. मादी तस्कर साप दहा ते अकरा अंडी घालते. शरीराचे वेटोळे करून ती त्यांना उबवते.  अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यानंतरच आपल्या मार्गात ती तेथील जागा सोडून देते.

Web Title: Release the eight-foot dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.