Join us

मार्च-एप्रिलमध्ये सर्वाधिक सापांची सुटका, सर्प संस्थेचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 5:15 AM

उन्हाच्या झळा बसू लागल्यावर वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवीवस्तीमध्ये शिरण्याचे प्रमाण जास्त असते. सरपटणारे प्राणी व प्राणी-पक्षी यांना वेळेत पाणी मिळाले नाही, तर उष्माघाताचे शिकार होतात.

मुंबई : उन्हाच्या झळा बसू लागल्यावर वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवीवस्तीमध्ये शिरण्याचे प्रमाण जास्त असते. सरपटणारे प्राणी व प्राणी-पक्षी यांना वेळेत पाणी मिळाले नाही, तर उष्माघाताचे शिकार होतात. उन्हाळ्यात सर्वाधिक पाण्याच्या शोधात सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. तसेच पक्षी व प्राणी हेसुद्धा उष्माघाताचे शिकार होतात. परंतु नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती बऱ्यापैकी झाल्यामुळे एखादा प्राणी आढळून आल्यास त्वरित प्राणिमित्र संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क करून माहिती दिली जाते. मार्च-एप्रिल महिन्यात किती वन्यजीवांना रेस्क्यू केले, याचा अहवाल सर्प संस्थेने नुकताच सादर केला आहे.सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाईल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) संस्थेने मार्च महिन्यात ८७ साप, १४ पक्षी आणि एका प्राण्याला रेस्क्यू केले आहे. एप्रिल महिन्यात संस्थेने ९३ सरपटणारे प्राणी, १७ पक्षी आणि एक प्राणी रेस्क्यू केला. मानवीवस्तीमध्ये गारव्यासाठी साप वाहनांखाली आणि झाडांच्या कुंड्यांखाली बसलेले असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे. सर्पदंशामुळे अनेक जण प्राण गमावत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यजीवांबद्दल प्रेम, आपुलकी आणि माया निर्माण व्हावी, यासाठी संस्थेने दोन्ही महिन्यांत तीन जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाईल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प) संस्थेचे संस्थापक संतोष शिंदे म्हणाले की, रेस्क्यू करण्यात आलेल्या सापांमध्ये २३ नाग, ३ घोणस, २० धामण हे प्राणी ताब्यात घेतले. तसेच पक्ष्यांमध्ये घार, घुबड, कोकिळा, कावळा आणि बुलबुल इत्यादी पक्षी रेस्क्यू केले. प्राणी, पक्षी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे का? हे तपासले जाते. प्रकृती चिंताजनक वाटल्यास त्यांच्यावर उपचार करून मग त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.सप्रेडिंग अवेयरनेस आॅन रेप्टाईल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम (सर्प ) संस्थेने मार्च महिन्यात ८७ साप, १४ पक्षी आणि एका प्राण्याला रेस्क्यू केले आहे. एप्रिल महिन्यात संस्थेने ९३ सरपटणारे प्राणी, १७ पक्षी आणि एक प्राणी रेस्क्यू केला. संस्थेने या काळात जनजागृतीपर कार्यक्रमही घेतले़

टॅग्स :साप