फिल्म हेरिटेज फाऊंडेशनला समर्पित विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 22:07 IST2024-06-14T22:06:53+5:302024-06-14T22:07:19+5:30
फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे संचालक शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

फिल्म हेरिटेज फाऊंडेशनला समर्पित विशेष पोस्टल कव्हरचे प्रकाशन
श्रीकांत जाधव
मुंबई : भारताच्या सोनेरी आणि वैविध्यपूर्ण चित्रपट वारसा जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी फिल्म हेरिटेज फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कल तर्फे फिल्म हेरिटेज फाऊंडेशनला समर्पित असे विशेष पोस्टल कव्हर आणि विशेष कैंसिलेशन शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले.
जीपीओ मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, मुख्य पोस्टमास्टर जनरल के. के. शर्मा, पोस्टमास्टर जनरल मुंबई क्षेत्रचे अमिताभ सिंग आणि संचालक अभिजीत बनसोडे उपस्थित होते. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे संचालक शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.