Join us

मासेमारीच्या जाळ्यात व पिंपात अडकलेल्या दोन सापांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:05 AM

मुंबई : मासेमारीच्या जाळ्यात अडकलेला घोणस आणि पाण्याच्या पिंपात पडलेला नाग या दोन्ही विषारी सापांची मुंबईतून सुखरूपपणे सुटका करण्यात ...

मुंबई : मासेमारीच्या जाळ्यात अडकलेला घोणस आणि पाण्याच्या पिंपात पडलेला नाग या दोन्ही विषारी सापांची मुंबईतून सुखरूपपणे सुटका करण्यात आली. अम्मा केअर फाउंडेशन आणि प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई या संस्थेच्या स्वयंसेवकांनी या सापांना वाचविले.

शुक्रवारी सकाळी जुहू येथून अक्षय कुमार मांगेला यांचा जाळ्यात अडकलेल्या सापाच्या रेस्क्यूसाठी फोन आला. यावेळी संस्थेच्या स्वयंसेवक सुष्मिता दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घोणस साप मासेमारीच्या नायलॉनच्या जाळ्यात अडकलेला आढळला. जाळ्यातून सापाची सुटका करणे सोपे काम नसल्याने त्यांनी मदतीसाठी स्वयंसेवक सुनील गुप्ता यांना बोलावले. या सापाच्या जबडा व गळ्याभोवती जाळ्याचे धागे अडकल्याने सापाला वेदना होत होत्या. यातून सापाची सुटका करण्यासाठी सापाला पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे यांच्याकडे नेले. यावेळी डॉक्टरांनी अत्यंत सूक्ष्म साधने वापरून सापाला हळुवारपणे धाग्यांपासून मुक्त केले.

तर त्याच दिवशी बोरिवली येथील साईबाबा नगर परिसरात एका पाण्याच्या पिंपात दोन फुटांचा नाग पडला असल्याचे संस्थेच्या स्वयंसेवकांना कळविण्यात आले. यावेळी घटनास्थळी जाऊन. स्वयंसेवक आकाश पनादया आणि सुनील गुप्ता यांनी या नागाला वाचविले. या दोन्ही सापांबद्दल वनविभागाला माहिती देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती एसीएफ पीएडब्ल्यूएस मुंबईचे संस्थापक मानद वन्यजीव वार्डन सुनीश सुब्रमण्यन यांनी दिली.

फोटो आहे - ०९ साप