जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
By admin | Published: October 1, 2014 11:11 PM2014-10-01T23:11:25+5:302014-10-01T23:11:25+5:30
परतीच्या पावसाने जिल्हय़ात धुमाकूळ घातला असून वादळी पावसामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. महावितरणची सेवा 24 तासांपासून पूर्णपणो ठप्प झाली आहे.
Next
खालापूर : परतीच्या पावसाने जिल्हय़ात धुमाकूळ घातला असून वादळी पावसामुळे शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले. महावितरणची सेवा 24 तासांपासून पूर्णपणो ठप्प झाली आहे. घरांवरील छपरे आणि मोठमोठे वृक्ष यांचे नुकसान झाले आहे. खाणाव येथील एका कंपनीला पावसाचा तडाखा बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वावोशी, डोनवतसह खाणाव भागातील जनजीवन पूर्णपणो विस्कळीत झाले आहे.
खालापूर तालुक्यातही वादळी वारा, गारांसह पावसाने मंगळवारी सायंकाळी धुमाकूळ घातला होता. गारांसह जोरदार पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा याचा सर्वाधिक फटका दहा गाव, वावोशी, चात्तीशी विभागाला बसला आहे. डोणवत, गोरठण, स्वाली, नारंगी, चिलठण, खिरवली, उजलोली, भोकरपाडा, खाणाव, गोळेवाडी आदी गावांमधील अनेक घरांवरील छपरे उडाली. उजलोली गावातील शेतक:यांची भातशेती पूर्णपणो उद्ध्वस्त झाली आहे. दोनवत ते गोळेवाडीपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्याने संपूर्ण रात्र रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. वादळाचा सर्वाधिक फटका हा महावितरणला बसला आहे. दोनवत ते खाणाव दरम्यान जागोजागी विजेचे लोखंडी आणि सिमेंटचे विद्युत पोल कोसळले आहेत. वीज पुरवठा 24 तासांहून अधिक काळ खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागली
वादळी वा:याचा फटका अनेक घरांना बसला असून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ब:याच ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून काही ठिकाणी भातशेतीचे नुकसान झाले आहे. कर्मचारी पंचनामे करीत असून नुकसानीचा अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समोर येईल मात्र नागरिकांनी सहकार्य करावे, सर्वच नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात येतील.
- दीपक आकडे, तहसीलदार
वा:यामुळे वावोशी भागात ब:याच ठिकाणी पोल वाकले आहेत. झाडांच्या फांद्या वीजेच्या तारांवर पडल्याने तारा तुटल्यात. महावितरणचे कर्मचारी खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असून सायंकाळर्पयत गावांमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-विशाल सूर्यवंशी,
महावितरण अभियंता, वावोशी
पाली-सुधागडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंदगरब्यालाही पावसाचा फटका
4अलिबाग - ऐन नवरात्रोत्सवात परतीच्या वादळी पावसाने जिल्हय़ाला झोडपून काढले. त्यामुळे गरबा नृत्यांच्या आयोजनावर त्याचा परिणाम झाला आणि तरुणाई थोडी हिरमुसली होती. दरम्यान, दुपारनंतर झालेल्या या पावसात सर्वाधिक 61 मिमी पावसाची नोंद पाली-सुधागड येथे झाली. जिल्ह्यात अन्यत्र माणगांव-52, उरण-42, म्हसळा-37, तळा-3क्, रोहा-23,पनवेल-2क्, श्रीवर्धन-19 ,मुरुड-16, पेण-1क्.4, खालापूर-क्6,अलिबाग-क्5, महाड व पोलादपूर-क्2 तर गिरीस्थान माथेरान येथे 32 मिमी पावसाची नोंद झाली.
371 मिमी अधिक पजर्न्यमान
4यंदा 1 जूनपासून 3क् सप्टेंबरअखेर एकूण पावसाची नोंद 44 हजार 663.75 मिमी झाली असून जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान 2 हजार 791 मिमी झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत 371 मिमी पजर्न्यमान अधिक झाले आहे.
माथेरानमध्ये 125.67 टक्के सरासरी पजर्न्यमान
4यंदा 125.67 टक्के असे सर्वाधिक पजर्न्यमान गिरीस्थान माथेरान येथे झाले आहे. उर्वरित ठिकाणी अलिबाग-1क्6.14, पेण-1क्5.34, मुरुड-84.32, पनवेल-87.76, उरण-98.55, कजर्त-91.43, खालापूर-86.31, माणगांव-84.13, रोहा-94.46, पाली-सुधागड-74.क्7, तळा-9क्.4क्, महाड-73.89, पोलादपूर-85.क्5, म्हसळा-78.42 तर श्रीवर्धन टक्के 72.56 टक्के पजर्न्यमान झाले आहे.
प्लोअर मिलचे सिमेंटचे पत्रे उडाले
1खाणाव येथे जे. के. फ्लोअर मिलला वादळी वारे व पावसाने जबरदस्त फटका दिला आहे. संपूर्ण कंपनीवरील सिमेंट पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी गोडावून आणि मालाची प्रक्रि या करणा:या प्लांटमध्ये शिरल्याने गहू मोठय़ा प्रमाणात भिजला आहे. बाजारात विक्र ीसाठी तयार असणारे उत्पादन पाण्याने पूर्णपणो ओले झाले आहे. त्यातच कंपनी आवारात असणारे चार वृक्ष कोसळले, तर कामगारांसाठी असणा:या निवारा शेड उद्ध्वस्त झाल्या आहेत. सत्तर ते अंशी लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनीचे मालक कन्हय्यालाल वालेचा यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.
2याबाबत खालापूर आपत्ती विभागाचे प्रमुख तहसीलदार दीपक आकडे यांनी काही ठिकाणांची पाहणी केली असून तातडीने महसूल कर्मचा:यांनी पंचनामे सुरु केले आहेत. वीज गायब असल्याने ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत. आपत्ती विभागाने नुकसानीची पाहणी करून आर्थिक स्वरु पात मदत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंगळवारी जोरदार वादळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील लोणोरे परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. त्यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. बी. लेंगरे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचा:यांना रस्त्यावरील झाडे तोडावी लागली.