Join us

जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2018 11:50 AM

मुकेश अंबानींकडून जिओ फोन-2ची घोषणा

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन असेल. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची बैठक सुरू आहे. रिलायन्स समूहाच्या वार्षिक बैठकील 11 वाजता सुरुवात झाली. या बैठकीत जिओ-2 ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सअॅप वापरता येऊ शकतं. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपची सुविधा नव्हती. जिओ फोन-2 मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-2 लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचं उत्पादन बंद केलं जाणार नाही. हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील. 

रिलायन्स जिओ फोन-2 ची किंमत 2,999 हजार रुपये असेल. तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन-2 खरेदी करु शकता. 15 ऑगस्टपासून हा फोन उपलब्ध होईल. जिओ फोनवर आता फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप मोफत वापरता येईल. 

टॅग्स :रिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशनरिलायन्समुकेश अंबानी