रिलायन्सचीही वीज कडाडणार!

By admin | Published: February 19, 2015 02:59 AM2015-02-19T02:59:09+5:302015-02-19T02:59:09+5:30

औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नवीन प्रस्ताव सादर केला

Reliance will power too! | रिलायन्सचीही वीज कडाडणार!

रिलायन्सचीही वीज कडाडणार!

Next

मुंबईकर वीज ग्राहकांना शॉक : २० टक्के दरवाढीकरिता १८०० कोटींचा प्रस्ताव आयोगाकडे सादर
मुंबई : औद्योगिक वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नवीन प्रस्ताव सादर केला असतानाच आता मुंबईतील रिलायन्सच्या वीज ग्राहकांनाही वीज दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.
रिलायन्सने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १८ ते २० टक्के दरवाढीकरिता १८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक आणि घरगुती अशा सरकट वर्गवारीला समोर धरून रिलायन्सने वीज दरवाढ मंजूर करण्यात यावी, असे म्हटले आहे. प्रस्तावामध्ये प्राथमिक १८ ते २० टक्के ही सरसकट दरवाढ असून, ६० ते ७० अशा वर्गवारींचा विचार करता काही घरगुती ग्राहकांना म्हणजे अधिक युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ३० ते ४० टक्के वीजदरवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
रिलायन्स आणि टाटा पॉवर या दोन खासगी कंपन्यांमध्ये मुंबईतील वीज ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धा आहे. टाटाची १०० युनिटपर्यंतची वीज रिलायन्सच्या तुलनेत स्वस्त असल्याने रिलायन्सचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे धाव घेत आहेत. दुसरीकडे टाटाच्या तुलनेत रिलायन्सकडून उद्योगांना देण्यात येणारी वीज स्वस्त आहे. मात्र दोन्ही कंपन्यांमध्ये घरगुती वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जर रिलायन्सचा २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा १८ ते २० टक्के दरवाढीचा १८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुर केला तर रिलायन्सच्या वीज ग्राहकांचे कंबरडे मोडेल. आणि पुन्हा रिलायन्सचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे वळतील. तर तिसरीकडे टाटाने अद्याप आर्थिक वर्षांतील दरवाढीसाठी पाऊल उचलले नाही. येत्या सोमवार अथवा बुधवारपर्यंत टाटादेखील दरवाढीबाबत पाऊल उचलण्याची शक्यता असून, त्यानंतर दोन्ही कंपन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होईल. दरम्यान, आयोगाने याबाबत जनतेकडून ना-हरकती आणि सूचना मांडण्यासाठी ११ मार्च ही तारीख रिलायन्सला दिली आहे. आणि या वीजदरवाढीच्या प्रस्तावाची जनसुनावणी १६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता कफ परेड येथील वर्ल्ड टे्रड सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

महावितरणची वीज मार्चमध्ये होणार स्वस्त
गेल्या वर्षी मार्चमध्ये मासिक ४९० कोटी रुपयांचा अधिभार लावल्याने महागड्या विजेचा भार सहन कराव्या लागणाऱ्या ग्राहकांना त्यापासून मुक्ती मिळणार आहे.

सध्याच्या औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर रुपये ८.५९ ऐवजी ७.५९ आणि नॉन एक्स्प्रेस फीडरवरील औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट दर रुपये ७.८२ ऐवजी ६.८८ पैसे हा दर लागू होईल. -वृत्त/३

 

Web Title: Reliance will power too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.