Join us

शासकीय तंत्रनिकेतनच्या ८०० विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 5:18 AM

आज १४ मे रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळात पुनर्परीक्षा घेण्यात येतील अशी नोटीस शासकीय विधी महाविद्यालयाने शुक्रवारी काढली.

मुंबई : वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला होता, मात्र युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाची ही चूक उघडकीस आणून ८०० विद्यार्थ्यांना त्यांना नाहक भरावी लागलेली फी माफ करण्यास महाविद्यालय प्रशासनाला भाग पाडले.वांद्रे पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात प्रथम सत्रातच सोशलवर्क या विषयाचा समावेश करणे आवश्यक होते, परंतु महाविद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सहाव्या सत्राची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सोशलवर्क विषयासाठी आॅनलाइन नोंदणी करावी लागली. त्यासाठी महाविद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक हजार रुपये फी घेतली. युवासेनेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी महाविद्यालयात सलग चार तास धरणे आंदोलन केले. त्यावर प्राचार्यांनी आपली चूक मान्य करून विद्यार्थ्यांनी भरलेले पैसे त्यांना परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. याप्रसंगी सिनेट सदस्य वैभव थोरात, शीतल शेठ, निखिल जाधव उपस्थित होते.आज होणार त्या विद्यार्थ्यांची परीक्षाविधी अभ्यासक्रमाच्या तिसºया आणि पाचव्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणाºया २७० विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पुनर्परीक्षा तातडीने जाहीर कराव्यात या विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश आले आहे. आज १४ मे रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळात पुनर्परीक्षा घेण्यात येतील अशी नोटीस शासकीय विधी महाविद्यालयाने शुक्रवारी काढली. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून त्यांचा परीक्षा क्रमांक घेऊन जावा, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी याप्रकरणी मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. अंतर्गत पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाच्या बैठकीमध्येही घेण्यात आला आणि त्यासंदर्भात शासकीय विधी महाविद्यालयालाही ४ मे रोजी कळवण्यात आले होते. तरीसुद्धा पुनर्परीक्षा जाहीर करण्यात न आल्याने युवासेनेच्या वतीने शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा केवले यांना निवेदन दिले होते.

टॅग्स :मुंबई