वसई : खोल समुद्रात मासेमारी करताना मृत्यूमुखी पडणाऱ्या मच्छीमारांच्या वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी याकरीता आ. क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून लवकरच यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध शासकीय अडथळे पार करत ही आर्थिकमदत मिळवताना मयत मच्छीमाराच्या कुटूंबीयांना दिव्यातून जावे लागते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर आ. ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागीतली आहे.वसई, पालघर व डहाणू या ४ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते. हजारो मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असतात. वादळी वारे व अन्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मच्छीमार मासेमारी करताना अपघातामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर कुटुंबाची अवस्था बिकट असते. केंद्र सरकारने आर्थिक मदत देण्याच्या योजना कार्यान्वित केल्या. परंतु त्यातही अडवणूक होते. अशा तक्रारी आल्यानंतर आ. क्षितीज ठाकूर यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला. लवकरच यासंदर्भात बैठक होईल.
मच्छीमारांच्या कुटुंबीयांना दिलासा?
By admin | Published: December 04, 2014 11:50 PM