हार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:35 AM2018-01-24T03:35:20+5:302018-01-24T03:35:34+5:30

हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 Relief for Harbor passengers, 26 local trains will increase | हार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार

हार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार

googlenewsNext

मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १० फे-या हार्बर मार्गावर आणि १६ फे-या ट्रान्सहार्बर मार्गावर चालविण्यात येतील. ३१ जानेवारीपासून या लोकल फे-या सुरू होतील.
२६ वाढीव फे-यांमुळे हार्बरवरील लोकल फे-यांची संख्या ६०४ वरून ६१४ झाली आहे. ट्रान्स हार्बरवरील फे-यांची संख्या २४६ वरून २६२ झाली आहे, तर मध्य रेल्वेवर रोज होणा-या एकूण लोकल फे-यांची संख्या १,७०६ वरून १,७३२ वर पोहोचली आहे. तूर्तास मध्य रेल्वेने ‘प्लॅन बी’नुसार हार्बर मार्गावरील वाढीव फे-या वडाळा येथून चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Web Title:  Relief for Harbor passengers, 26 local trains will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.