२७ अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:34 IST2021-02-25T17:34:10+5:302021-02-25T17:34:32+5:30
२७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना आता नोंदणीसाठीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

२७ अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना दिलासा
मुंबई : २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना आता नोंदणीसाठीची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली.
अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी साध्या यंत्रमाग धारकांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत ही मागणी लावून धरली होती. भिवंडीचे आमदार रईस शेख, माजी आमदार रशीद ताहीर मोमेन, माजी आमदार आसीफ शेख रशीद, तारीख फारुकी यांनी देखील ही प्रक्रिया ऑफलाइन करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
२७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना वीज जोडणीची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सर्व्हर डाऊनसारख्या अडचणींना सामोरं जावं लागत असे. आता ऑफलाइनचा पर्यायही देण्यात आल्याने छोट्या यंत्रमाग धारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.