Join us

गोरेगावमधील पत्रा चाळवासीयांना दिलासा

By admin | Published: May 07, 2017 6:42 AM

गोरेगाव सिद्धार्थनगरमधील पत्रा चाळीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांना या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगाव सिद्धार्थनगरमधील पत्रा चाळीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांना या संदर्भात त्वरित चौकशीचे आदेश दिले. संबंधित विकासकांना समज देत, येत्या पंधरा दिवसांत स्थानिक रहिवाशांशी सुधारित करारनामा करावा. त्यांचे देय भाडे त्वरित द्यावे. त्यांच्या पुनर्विकासाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करावी, तसे न केल्यास सदर प्रकल्प शासन ताब्यात घेईल आणि पुनर्विकासाच्या इमारतींचे काम पूर्ण करून, प्रथम भाडेकरूंना घरे देत, इतर विक्रीयोग्य इमारती शासन बाजारभावाने विकेल, असे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी मांडले.गेली अनेक वर्षे म्हाडा प्रकल्पातील गोरेगाव (प) मधील सिद्धार्थनगर पत्रा चाळीतील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. गेली दोन वर्षे विकासकाने भाडेही न दिल्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. या संदर्भात महालेखापालांनी सादर केलेल्या अहवालात सरकारला देय असलेल्या जागे संदर्भातील आपल्या निरीक्षणावर आधारित अभिप्राय दिला. त्या अनुषंगाने अद्याप मूळ रहिवाशांचा त्रिपक्षीय करार झालेला नाही. अशा परिस्थितीत भाडेकरूंना द्यावयाच्या घरांचे बांधकाम ठप्प असून, त्या तुलनेने विकासकाला दिलेल्या विक्रीयोग्य इमारतींचे काम मात्र जोरात चालू आहे. या संदर्भात आपली न्याय बाजू मांडण्यासाठी पत्रा चाळीतील रहिवाशांच्या प्रतिनिधींची नुकतीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत, संबंधित अधिकाऱ्यांची बैठक वर्षा बंगल्यावर आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.