Join us

संजय निरुपम यांना दिलासा

By admin | Published: February 07, 2016 1:50 AM

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना ‘काँग्रेस दर्शन’ या पक्षाच्या मुखपत्रात प्रकाशित वादग्रस्त लेखप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना ‘काँग्रेस दर्शन’ या पक्षाच्या मुखपत्रात प्रकाशित वादग्रस्त लेखप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वडिलांचा फॅसिस्ट सैनिक असा उल्लेख करणाऱ्या या लेखांबद्दल निरुपम यांची माफी स्वीकारली असून, भविष्यात सतर्क राहण्याची सूचना त्यांना केली आहे.मात्र छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना पोटनिवडणुकीतील फिक्सिंगप्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण मागितले आहे. याच मुद्यावरून त्यांचे पुत्र अमित जोगी यांना गेल्या महिन्यात पक्षातून काढण्यात आले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अ‍ॅन्टनी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय शिस्तपालन समितीने जोगींना दोन आठवड्यांच्या आत त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.संजय निरुपम यांनी ‘काँग्रेस दर्शन’मध्ये काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध प्रकाशित चुकीच्या आणि निराधार लेखांची जबाबदारी स्वीकारून विनाअट क्षमा मागितली होती. (वृत्तसंस्था)आॅडिओ टेपमध्ये अडकले जोगीछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी एका आॅडिओ टेपमुळे अडचणीत आले आहेत. २०१४ च्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पैसे घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला माघारी घेण्यात आल्याचा गौप्यस्फोट या आॅडिओमुळे झाला होता. त्यानंतर महिनाभराने काँग्रेसने जोगी यांना स्पष्टीकरण मागितले आहे. या ध्वनिफितीत तत्कालीन काही प्रमुख राजकीय नेत्यांदरम्यान झालेल्या संभाषणात अजित आणि अमित जोगी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आले होते; परंतु जोगी पिता-पुत्रांनी याचा इन्कार केला आहे. अमित जोगी यांची गेल्या महिन्यातच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ते पक्षाचे आमदारही आहेत.