ठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा; मागील ४८ तासांत कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:33 PM2020-04-01T18:33:56+5:302020-04-01T20:59:05+5:30

ठाणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. मागील ४८ तासात ठाण्यात नव्याने कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. परंतु क्वॉरन्टाइनची संख्या वाढत आहे. पालिकेने खरबदारीचे उपाय हाती घेतले असून समस्त ठाणेकरांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.

Relief for Thane citizens, no new Corona charges reported in last 3 hours | ठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा; मागील ४८ तासांत कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही

ठाण्यातील नागरिकांसाठी दिलासा; मागील ४८ तासांत कोरोनाच्या एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही

Next

ठाणे: लॉक डाऊन सुरु झाल्यापासून मुंबईत कोरोना बाधीतांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाण्यातही मागील काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत होती. मात्र आता ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. मागील ४८ तासात ठाणे शहरात एकाही नव्या कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे ठाणेकरांना हा काहीसा दिलासा असला तरी ठाणेकरांनी घरीच राहावे असे आवाहन केले आहे.
                कोरोना व्हायरसचे सोमवारी दोन रु ग्ण ठाण्यात आढळले होते. हे दोन रु ग्ण वर्तकनगर भागात आढळले होते. त्यामुळे आता ठाण्यात कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या १२ झाली होती. नागरीकांनी संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना बाधीत रु ग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रु ग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडयÞांनी रु ग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसून आली. कळव्यातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. तर आतापर्यंत शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १२ वर गेली आहे. कोरोना आता तिसऱ्या स्टेजला आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे. याच तिसºया स्टेजला संसर्गातून हा व्हायरस मोठ्या प्रमाणात परसत असतो. त्यामूळेच लॉकडाऊनच्या काळात कारण नसताना कोणीही एक दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन वारंवार महापालिकेकडून करण्यात येत आहे. अशा वातावरणात मंगळवार आणि बुधवारी अशा दोन दिवसात एकाही नव्या कोरोना ग्रस्त रु ग्णांची नोंद ठाण्यात झाली नसल्याची माहिती न झाल्याने शहरासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

  • दरम्यान आता पर्यंत पालिकेच्या माध्यमातून ०१ एप्रिल पर्यंत २१९१ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९८२ नागरीक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या १२०९ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत २०५२ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ६२ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ४५ जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत ९ जणांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य तीन रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ७४ संशयीतांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: Relief for Thane citizens, no new Corona charges reported in last 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.