वीज ग्राहकांना दिलासा; 5,ooo रुपयांपर्यंत बिल भरता येणार रोखीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:34 PM2023-07-31T12:34:37+5:302023-07-31T12:35:01+5:30

...तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा १० हजार रुपये भरण्याची कमाल मर्यादा असणार आहे.

Relief to electricity consumers; Bills up to Rs.5,ooo can be paid in cash | वीज ग्राहकांना दिलासा; 5,ooo रुपयांपर्यंत बिल भरता येणार रोखीत 

वीज ग्राहकांना दिलासा; 5,ooo रुपयांपर्यंत बिल भरता येणार रोखीत 

googlenewsNext

मुंबई : वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. यापुढे विद्युत ग्राहकांना ५,००० रुपयांपर्यंतचे बिल रोखीत भरता येणार आहे. तसा निर्णय वीज नियामक आयोगाने घेतला आहे. याबाबतचे आदेश पुढील महिन्यापासून लागू करण्यात आले आहेत. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा १० हजार रुपये भरण्याची कमाल मर्यादा असणार आहे.

वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून वीजबिल रोखीत भरण्यासाठी ही कमाल मर्यादा आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सर्व ग्राहकांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५,००० रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येईल.

६५% ऑनलाइन सुविधांचा लाभ घेत आहे.
सद्य:स्थितीत महावितरणचे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाइन सुविधांचा लाभ घेत आहे. यातून दरमहा महावितरणला साधारणत: २,२५० कोटी महसुलाची वसुली होते.

वीजदेयके भरणा करण्यासाठी विविध मार्ग 
ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट अथवा डेबिटकार्ड, नेटबँकिंगसह युपीआय आदी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करता येणार आहे. 
भारत बिल पेमेंटमार्फत वीजबिल भरणा करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
क्रेडिट कार्डवगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. ऑनलाइन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५००) सवलत देण्यात आली.
 

Web Title: Relief to electricity consumers; Bills up to Rs.5,ooo can be paid in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.