Join us

आर्यन खानला दिलासा, सुटकेच्या आव्हानाची जनहित याचिका मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 7:14 AM

एनसीबीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी जनहित याचिका बुधवारी मागे घेण्यात आली.

मुंबई :  बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानची क्रुझ शिप ड्रग्जप्रकरणी एनसीबीने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी जनहित याचिका बुधवारी मागे घेण्यात आली.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी)  विशेष तपास पथकाने (एसआयटी) आर्यनला मे महिन्यात क्लीन चिट दिली. एसआयटीच्या या निर्णयाला विधी शाखेचा विद्यार्थी प्रीतम देसाई याने जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोपीला क्लीन चिट देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाला आहे, तपासयंत्रणेला नाही, असा युक्तिवाद याचिकादाराचे वकील सुबोध पाठक यांनी न्यायालयात केला. 

या निर्णयाला आव्हान देण्याचा तुमचा अधिकार काय? असा सवाल न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठाने याचिकादाराला केला. ‘लॉचा विद्यार्थी म्हणून त्याने चांगल्या कारणासाठी जनहित याचिका दाखल कराव्यात. ही प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर पाठक यांनी त्यांच्या अशिलाकडून सूचना घेत आर्यन खानविरोधातील याचिका मागे घेतली.

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोशाहरुख खान