Join us

ट्रकचालकांना आरटीपीसीआर चाचणीतून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

परराज्यांतील मालवाहतुकीबाबत आदेशात सुधारणालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे रोजी लागू करण्यात आलेल्या ...

परराज्यांतील मालवाहतुकीबाबत आदेशात सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ मे रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशानुसार, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या मालवाहतुकीसाठी ट्रकचालकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले हाेते. मात्र, शनिवारी या आदेशात सुधारणा करण्यात आली असून ट्रकचालकांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेशानुसार, मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोनपेक्षा जास्त लोक (एक चालक आणि क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक आणि क्लीनर / मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. मालवाहक महाराष्ट्राबाहेरून येणार असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. यांपैकी एकालाही काेराेनाची लक्षणे आढळल्यास सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात येईल.

दरम्यान, जय भगवान ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वनवे यांनी सांगितले की, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे वाहतूकदार आणि ट्रकचालकांना दिलासा मिळेल. तसेच पुरवठा साखळी सुरळीत राहण्यास मदत होईल.