धर्म आपल्याला विभागत आहे - दलाई लामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 01:48 PM2018-12-12T13:48:10+5:302018-12-12T13:50:13+5:30
मुंबई विद्यापीठाच्या फिलॉसॉफी डिपार्टमेंटने आयोजित 'कन्सेप्ट ऑफ मैत्री इन बुद्धिजम' हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या सत्राच्या उद्घाटनला तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा हजर होते.
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या फिलॉसॉफी डिपार्टमेंटने आयोजित 'कन्सेप्ट ऑफ मैत्री इन बुद्धिजम' हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या सत्राच्या उद्घाटनला तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा, मंत्री राजकुमार बडोले आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर उपस्थित होते. या उद्घाटनवेळी दलाई लामा यांनी मैत्री, करुणा प्रेम भावना या अंगीकारण्यासाठी शिक्षण घ्यायला हवे तरच आपण आयुष्य आनंदात घालवू शकतो. याशिवाय शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणात बदल करने सुद्धा आवश्यक असल्याचा त्यांनी सांगितलं.
दलाई लामा पुढे असंही म्हणाले की, जीवनात कोणत्याही समस्या हातात शस्त्र घेऊन सोडवल्या जाऊ शकत नाही. त्यासाठी सेंटर ऑफ डायलॉग ( संवाद ) करणे महत्त्वाचे आहे. 21व्या शतकात सर्वांना शांतता हवी आहे. मात्र, आता शांतता हवी असेल तर आपल्याला समस्या सोडवण्यासाठी संवाद करणं आवश्यक आहे.
दलाई लामांच्या भाषणातील मुद्दे :
'शत्रूलाही प्रेमभावनेनं सामोरे गेले पाहिजे'
धर्म आपल्याला विभागत आहे आणि हे खूप वाईट आहे. प्रेम भाव हा खूप सहज अंगीकार करू शकतो, प्राणीमात्रांना सुद्धा हा भाव माहीत आहेत. आपल्या शत्रूला सुद्धा आपण प्रेम भावनेने सामोरे गेलं पहिले, असे दलाई लामा म्हणाले.
'राग सुख भावनेला नष्ट करतात'
राग, क्रोध आपल्या सुखी असणाऱ्या भावनेला नष्ट करतात. त्यामुळे राग क्रोध बाजूला ठेवून आपण प्रेम भावनेने वागायला शिकलं पाहिजे.
'शिक्षण पद्धतीत बदल आवश्यक'
आपल्या शिक्षणात जर आपण बदल नाही केला तर पुन्हा मागील शतकात ज्या प्रकारे युद्धं झाली, हिंसा झाली त्यांचा सामना कदाचित पुन्हा करावा लागेल. आपल्याला मॉडर्न शिक्षणात बदल करताना कोणत्याही धर्माला हात न लावता सेक्युलर मार्गाने आपल्याला बदल करावा लागणार आहे.