मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 09:34 PM2022-07-29T21:34:24+5:302022-07-29T21:35:13+5:30

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

Remarkable contribution of Rajasthani Gujarati community in making Mumbai the financial capital says Bhagat Singh Koshyari | मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी

googlenewsNext

मुंबई-

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. 

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केलं. राजस्थानी मारवाडी समाजानं व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालयं, इस्पितळं बांधली व गोरगरिबांची सेवा केली.  राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथं तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो, असं राज्यपालांनी म्हटलं.

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असं राज्यपालांनी सांगितलं.

Web Title: Remarkable contribution of Rajasthani Gujarati community in making Mumbai the financial capital says Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.