‘रेमडेसिविर’चा कोविड रुग्णांचा मृत्यू राेखण्याशी संबंध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:06 AM2021-04-12T04:06:22+5:302021-04-12T04:06:22+5:30
टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मत; इंजेक्शन खरेदीसाठी गर्दी करू नका लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा कोविड रुग्णांचा ...
टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मत; इंजेक्शन खरेदीसाठी गर्दी करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा कोविड रुग्णांचा मृत्यू राेखण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊन इंजेक्शनच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असा सल्ला कोरोना टास्क फोर्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. या इंजेक्शनचा वापर हेपेटायटिसच्या उपचार प्रक्रियेत केला जायचा, त्यानंतर इबोलावर उपचार करण्यासाठी वापरले जायचे. मात्र या इंजेक्शनमुळे मृत्यू टाळण्यास उपयोग होत नसून केवळ रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे. रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या पुरवठादार आणि डिस्ट्रिब्युटर्सकडी साठ्याची माहिती द्यावी लागेल. तसेच औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन औषधाच्या साठ्याबाबात कंपन्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी कऱण्याचे निर्देश दिले आहेत.
* इंजेक्शन ‘लाईफ सेव्हिंग’ औषधात येत नाही!
रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात उपलब्ध न झाल्यास नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, हे इंजेक्शन लाईफ सेव्हिंग औषधात येत नाही. या इंजेक्शनमुळे संसर्गाचे होणारा विस्तार रोखण्यास मदत होते, मात्र मृत्यू कमी करण्यासंदर्भात हे इंजेक्शन उपयुक्त नाही. जागतिक स्तरावरही अशा संदर्भातील कोणताही संशोधन अहवाल नाही. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी होतो, त्यामुळे दुसऱ्या रुग्णाला खाट मिळणे सोपे होते. रेमडेसिविर इंजेक्शनला दुसऱ्या अँटीव्हायरल औषध इंजेक्शनचाही पर्याय आहे. हे इंजेक्शनही संसर्गाच्या सुरुवातीच्या ५-६ दिवसांत दिल्यास परिणामकारक आहे. त्यामुळे या पर्यायाचाही वैद्यकीय तज्ज्ञांनी विचार करावा, अशी माहिती कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिली.
.................