वाहतूककोंडीवर उपाय; ठरावीकदिनी राहणार गोदामे बंद

By admin | Published: October 23, 2016 01:36 AM2016-10-23T01:36:01+5:302016-10-23T01:36:01+5:30

मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यावर तोडगा म्हणून भिवंडीतील गोदामे ठरावीक दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पुढील महिनाभरासाठी

Remedy for traffic; Stop the warehouses that remain fixed day | वाहतूककोंडीवर उपाय; ठरावीकदिनी राहणार गोदामे बंद

वाहतूककोंडीवर उपाय; ठरावीकदिनी राहणार गोदामे बंद

Next

ठाणे/अंबाडी : मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यावर तोडगा म्हणून भिवंडीतील गोदामे ठरावीक दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पुढील महिनाभरासाठी प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सध्या दिवाळी सण तोंडावर आल्याने मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, वसई, नवी मुंबई या महापालिकांच्या क्षेत्रातील व्यापारी भिवंडीतील गोदामपट्ट्यात आपल्या मालाची साठवणूक करून तो टप्प्याटप्प्याने मागवतात. परंतु, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वरसावे पुलाची दुरुस्ती आणि भिवंडीत होणाऱ्या पुलांच्या
कामांमुळे सर्व प्रकारची वाहतूक सध्या मनोर-भिवंडीमार्गे मुुंबईला वळवली आहे. वाहतूककोंडीवर उपाय म्हणून भिवंडीतील मौजे पूर्णा व राहनाळ हद्दीतील सर्व गोदामे आता दर मंगळवारी बंद राहतील. मौजे कशेळी, कोपर, काल्हेर हद्दीतील सर्व गोदामे दर बुधवारी आणि मौजे
दापोडे व वळ येथील सर्व
गोदामे दर शुक्रवारी बंद राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Remedy for traffic; Stop the warehouses that remain fixed day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.