मुंबई विद्यापीठात आनंदमूर्तींचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:07 AM2021-02-11T04:07:43+5:302021-02-11T04:07:43+5:30

मुंबई : आनंदमूर्तींच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी मुंबई विद्यापीठात आनंदमूर्तींच्या चिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाचा संगीत विभाग, आनंद ...

Remembrance of Anandamurti at Mumbai University | मुंबई विद्यापीठात आनंदमूर्तींचे स्मरण

मुंबई विद्यापीठात आनंदमूर्तींचे स्मरण

Next

मुंबई : आनंदमूर्तींच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी मुंबई विद्यापीठात आनंदमूर्तींच्या चिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई विद्यापीठाचा संगीत विभाग, आनंद मार्ग प्रचारक संघ, रेनासा युनिव्हर्सल, सांस्कृतिक शाखा रेनाॅसा आर्टिस्ट आणि रायटर्स असोसिएशन यांच्या वतीने हा चिंतन कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाचे अध्यक्ष डाॅ. चेतना पाठक यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. रवींद्र भारतीय विश्व विद्यालयाच्या नृत्यांगना कंकणा भट्टाचार्य यांनी प्रभात संगीतावर आधारित नृत्यनाट्य सादर केले. अमेरिकेतून आचार्य वेदप्रज्ञानंद अवधुत यांनी प्रभात संगीत सादर केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीजचे प्रमुख कपिल कपूर, आयसीआरच्या डाॅ. पूजा व्यास उपस्थित होते. आचार्य दिव्यचेतनानंद अवधूत, गायक पंडित विद्याधर व्यास, पंजाब विश्व विद्यालय संगीत विभागाचे डाॅ. पंकज माला शर्मा, महाडेश्वर स्वामी अभिषेक चेतनगिरी, रावाचे गायक आचार्य प्रियशिवानंद अवधूत, चारुदत्ता आफळे आदींनी आनंदमूर्तीजींच्या चिंतनावर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन रावाचे चेअरमन विजय अग्रवाल आणि डाॅ. चेतना पाठक यांनी केले.

Web Title: Remembrance of Anandamurti at Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.