रिमोटद्वारे डोकेदुखीवर मिळविले नियंत्रण!
By Admin | Published: November 6, 2014 01:41 AM2014-11-06T01:41:48+5:302014-11-06T01:41:48+5:30
ब्रिटनमधील एका बँकेत काम करणारे ३२ वर्षीय जॉर्ज वर्षभरापासून आॅक्सिपिटल न्यूरोलॉजिया नामक डोकेदुखीच्या आजाराने ग्रस्त होते.
औरंगाबाद : गेल्या साडेतीन वर्षांत महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३५४ कोटी रुपये थकविले आहेत. शहरातील वीज ग्राहकांकडून जीटीएल सक्तीने बिलाची वसुली करीत आहे; पण महावितरणकडे बिलाचे पूर्ण पैसे भरत नाही. त्यामुळे जीटीएलच्या थकबाकीचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे जीटीएलच्या पोबाऱ्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
शहरात वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून जीटीएल ३५० दशलक्ष युनिट वीज घेते. जीटीएलचे शहरात २ लाख ४५ हजार वीज ग्राहक आहेत. जीटीएलने शहरातील वीज वितरण करण्याचे काम घेतल्यापासून ३२ हजार नवीन वीज ग्राहकांना जोडणी दिली आहे.
या ग्राहकांकडून जीटीएल वीज बिलापोटी महिन्याला ८० कोटी रुपये वसूल करीत आहे. ग्राहकांकडून वसूल केलेले बिल जीटीएल महावितरणकडे भरत नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. कोर्टात एलबीटीचा वाद सुरू असताना २०१२ पासून थकलेल्या एलबीटी वसुलीचा निर्णय मध्येच का घेतला.
गेल्या काही महिन्यांत मनपानेही एलबीटीची मागणी केली नाही, असे असतानाही महावितरण आणि जीटीएलने आपापसात निर्णय घेऊन नागरिकांवर एलबीटीचा भुर्दंड का लावला? असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नाचे जीटीएल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडेही उत्तर नाही.
गेल्या काही महिन्यांमध्ये होत असलेल्या हालचालीतून जीटीएल जाण्याची तयारी करीत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. जीटीएल जाणार आणि नवीन कंपनी येणार, अशी चर्चा रंगत आहे. मनपा हद्दीतील ग्राहकांकडून आॅक्टोबरपासून एकूण बिलावर दोन टक्के एलबीटी वसूल करण्यात येत आहे.