नोटबंदीविरोधी याचिका निकाली
By admin | Published: November 18, 2016 06:53 AM2016-11-18T06:53:03+5:302016-11-18T06:53:03+5:30
काळ्या पैशाला पायबंद बसवण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई : काळ्या पैशाला पायबंद बसवण्यासाठी ५०० व १००० च्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा सरकारचा निर्णय जनहिताचा असून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने नोटाबंदीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दाखल केलेली याचिका गुरुवारी निकाली काढली.
सर्वोच्च न्यायालयात अशाच स्वरुपाच्या याचिका प्रलंबित असल्याने हायकोर्टने याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार दिला. केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयामुळे सामान्य नागरिकांचेर हाल होत आहेत. त्यामुळे सरकारला बँकेमध्ये पुरेसे चलन आणि सुट्टे पैसे उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी मनसेचे अखिल चित्रे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)