नेरळ : कर्जतमधील खांडस विभागातील आदिवासी महिलांना दिवाळीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धाबेवाडी, बांगारवाडी या वाड्यांंमध्ये महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच, आमदार सुरेश लाड यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात अधिकाºयांशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर अधिकाºयांनी आदिवासी भागात पाहणी करून पाणीटंचाईची दूर करण्याचे आश्वासन दिले.
आदिवासी वाड्यांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबत लाड यांची सूचना केल्या असून तसा पत्रव्यवहार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्याकडे करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर आजही कर्जत तालुक्यातील धाबेवाडी ग्रामस्थांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रात्रंदिवस डवºयावरच्या पिण्याचा पाण्याचा संघर्ष कायम आहे. दोन वाड्यांना येथील ५० वर्षे जुन्या विहिरीचा आधार होता. मात्र मुंबईच्या फार्महाऊस मालकाने विहीर बंदिस्त केल्याने आदिवासींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यावर विहिरीकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यात आला होता. मात्र तरीही आदिवासींना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी स्थानिक ग्रामपंचायत सरपंच मंगल एनकर, माजी सरपंच संतोष पाटील, विजय माळी, दिगंबर एनकर तर उपअभियंता लघुपाट बंधारे विभागाचे डी. आर. कांबळी उपस्थित होते. कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, विस्तार अधिकरी सुनील आहिरे यांनी सुद्धा धाबेवाडी ग्रामस्थांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जे कोणी ग्रामस्थांचा पाण्यासाठीचा रस्ता अडवला आहे, तो ताबडतोब खुला करून घेणे त्याच बरोबर लवकरात लवकर संबंधित अधिकाºयांची चर्चा करून ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमची दूर होईल, असे आश्वासन कोष्टी यांनी दिले.खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी, बांगारवाडी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याची दखल घेत आमदार सुरेश लाड यांनी अधिकारी वर्गाला या ठिकाणी पाठवले व संपूर्ण भागाची पाहणी केली आहे. त्यामुळे काही दिवसात या भागात पाणीटंचाईची समस्या दूर होईल अशी आशा आहे.- मंगल ऐनकर, सरपंच,खांडस ग्रामपंचायतवृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहून स्थानिक सरपंच, पंचायत समितीचे अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी आम्ही सर्वांनी कर्जत तालुक्यातील धाबेवाडी बांगरवाडी वाड्यांमध्ये जाऊन पाण्याची समस्या जाऊन घेतली आहे. विहिरीचे पाणी थोड्याच दिवसात आटणार आहे, परंतु आमदार सुरेश लाड यांच्या प्रयत्नाने येथे पाणी योजना मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसा पत्रव्यवहारही सुरू झाला आहे. लवकर ही पाणी योजना मंजूर होईल आणि या भागाचा पाणीप्रश्न लवकरच सुटेल.- अविनाश कोष्टी,तहसीलदार कर्जत