एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षांना पदावरून हटवा, उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:46 AM2020-10-29T02:46:55+5:302020-10-29T02:47:41+5:30
Mumbai High Court News : राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० व घटनेच्या अनुच्छेद १४, २१ आणि २५चा विचार करून रेखा शर्मा यांना महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी गोखले यांनी याचिकेद्वारे केली आहे.
मुंबई : ‘लव्ह जिहाद’वरून महिला व बालविकास मंत्रालयाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरवर केलेल्या विधानामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संकेत गोखले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जबाबदार असलेल्या रेखा शर्मा यांची मानसिकता ठीक नाही, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोग कायदा, १९९० व घटनेच्या अनुच्छेद १४, २१ आणि २५चा विचार करून रेखा शर्मा यांना महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी गोखले यांनी याचिकेद्वारे केली आहे. अलीकडेच रेखा शर्मा या राज्यपालांना भेटल्या. या भेटीत आपण महिलांच्या सुरक्षेसंबंधीचे मुद्दे आणि लव्ह जिहादसंबंधी प्रकरणांवर चर्चा केली असल्याचे खुद्द रेखा शर्मा यांनी त्यांच्या ट्विटरवर म्हटले आहे.
ट्विटरच्या शेवटच्या भागावर ‘लव्ह जिहादवर हादलव्हव्ह यावर गोखले यांनी आक्षेप घेतला. शर्मा यांनी जातीयवादी आणि दोन धर्मात फूट पाडणारे विधान केले. त्यामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षपणे काम करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ह्यलव्ह जिहादह्णची प्रकरणे वाढली आहेत, असे अध्यक्षांनी म्हटले असले तरी अशी कोणतीच प्रकरणे अस्तित्वात नाहीत. मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. आंतरधर्मीय जोडप्यांना अपमानित करण्यात येत आहे. मतभेद निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे गोखले यांनी म्हटले. ‘लव्ह जिहाद हा शब्द अनौपचारिक संदर्भात वापरला जातो. मुस्लीम पुरुष हिंदूविरुद्ध ‘जिहाद’ (मुस्लिमांच्या दृष्टीने पवित्र युद्ध) चालवित असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे, असेही गोखले यांनी याचिकेत म्हटले आहे.