आता मगरीसोबत काढा सेल्फी

By Admin | Published: May 6, 2017 06:41 AM2017-05-06T06:41:32+5:302017-05-06T06:41:32+5:30

भायखळ््याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात, राणीबागेत पेंग्विननंतर आता पर्यटकांना १८ फूट

Remove Selfie Now with Crocodile | आता मगरीसोबत काढा सेल्फी

आता मगरीसोबत काढा सेल्फी

googlenewsNext

चेतन ननावरे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळ््याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात, राणीबागेत पेंग्विननंतर आता पर्यटकांना १८ फूट लांब मगरींसोबत सेल्फी काढता येणार आहे. अधिकाधिक पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित करण्यासाठी राणीबागेतील जिजाबाई आणि बाल शिवराय यांच्या पुतळ््याजवळ हा नवा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. रविवारपासून हा सेल्फी पॉइंट पर्यटकांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘जोधा-अकबर’ या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत या १८ फुटी लांब मगरीचे चित्रीकरण करण्यात आले होते. रबर आणि फायबरपासून तयार करण्यात आलेल्या या दोन मगरींचा ताबा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरण यांच्याकडे होता. त्यानंतर, कला दिग्दर्शक तुषार सावंत यांनी त्याचा ताबा घेत, या मगरींच्या कलाकृतीवर काम केले. गेल्या दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर हे काम पूर्ण झाले आहे. २० फूट उंच फायबरपासून तयार केलेल्या मशरूमखाली या महाकाय मगरी विराजमान होणार आहेत. मगरींच्या सोबतीला चार माकडेही दिसणार आहेत. डोंगराएवढ्या मशरूमवर दोन माकडांच्या प्रतिकृती, तर मशरूमवर चढत असल्याच्या प्रसंगांमध्ये दोन माकडांच्या फायबरपासून तयार केलेल्या प्रतिकृती या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीच्या मनोरंजनाची पुरती काळजी कलाकाराने घेतल्याचे दिसते.
पर्यटकांना सेल्फी काढण्यासाठी या मशरूमशेजारी एक छोटेखानी धबधबाही तयार करण्यात आला आहे. वाहत्या धबधब्याच्या खळखळाटातून जाण्यासाठी एक लहानसा पूलही उभारण्याचे कसब कलाकाराने दाखवले आहे. त्यामुळे पुलावरून जाताना एकीकडे मशरूमसह मगर व माकडांच्या प्रतिकृती, तर दुसरीकडे उंच भिंतीप्रमाणे धबधब्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद पर्यटकांना या उन्हाळ््याच्या सुट्टीत लुटता येणार आहे.

मगरीने जबडा उघडल्यास दचकू नका!
या सेल्फी पॉइंटमधील एक मगर सर्वाधिक लक्षवेधक ठरेल. कारण आपोआप जबडा उघडून बंद करण्याची यांत्रिक जोडणी या प्रतिकृतीत केलेली आहे. त्यामुळे मगरीने अचानक जबडा उघडल्यानंतर दचकणारे पर्यटक राणीबागेत दिसले, तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: Remove Selfie Now with Crocodile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.