Join us

राज्यातील मागासलेल्या भागांचा अनुशेष दूर करा; डॉ. विजय दर्डा यांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 11:25 AM

डॉ. दर्डा यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली आणि अर्ध्या तासाच्या या भेटीत त्यांच्याशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि कोकणासह महाराष्ट्रातील सर्व मागासलेल्या प्रदेशांचा अनुशेष दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खा. डॉ. विजय दर्डा यांनी शनिवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. विदर्भातील रस्त्यांचा वाढता अनुशेष, आदिवासी भागांचा विकास आणि महाराष्ट्रातील शाळांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.

डॉ. दर्डा यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली आणि अर्ध्या तासाच्या या भेटीत त्यांच्याशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या असून, जोपर्यंत या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा योग्य कार्यक्रम सुरू होत नाही, तोपर्यंत झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न आणि नव्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न सुटणार नाही, असे डॉ. दर्डा यांनी राज्यपालांना सांगितले.

उपाययोजना करण्याचे आश्वासन नुकत्याच घडलेल्या महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटना आणि राज्यातील काही शाळांमध्ये घडलेल्या अस्वस्थ करणाऱ्या घटनांबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यपालांनी डॉ. दर्डा यांनी मांडलेले मुद्दे गांभीर्याने घेतले असून, या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :राजेंद्र दर्डा