कोपर्डी निकालाने ‘ती’ समाधानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:11 AM2017-11-30T07:11:21+5:302017-11-30T07:11:38+5:30

कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना बुधवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाबाबत मुंबईतील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

 Removing copperi 'she' satisfied! | कोपर्डी निकालाने ‘ती’ समाधानी!

कोपर्डी निकालाने ‘ती’ समाधानी!

Next

कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना बुधवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या निकालाबाबत मुंबईतील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, मुंबईसह देशातील मेट्रोपोलिटन शहरे आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यावर ‘लोकमत’ने महिलांच्या मनातील खदखदीला वाट मोकळी करून दिली आहे. मुंबईत वावरणाºया प्रत्येक ‘ती’ला कोपर्डी निकाल आणि सुरक्षेबाबत काय वाटते? याचा घेतलेला हा आढावा...

‘त्या’ खटल्यांचे
निकालही लावा!
कोपर्डीमधील बलात्कार पीडित तरुणीला अखेर न्याय मिळाला आहे. परंतु अशा गुन्हेगारांना शिक्षा होण्यास इतका विलंब होणे अपेक्षित नव्हते. गुन्हेगार गुन्हे करतील, न्यायालय त्यांना शिक्षा देईल, तत्पूर्वी महिलांच्या सुरक्षेसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. बलात्काराचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यायला हवी.
- पूजा दळवी, मानखुर्द

सुरक्षेसाठी प्रशासनाचे
प्रयत्न अपुरेच!
देशात बलात्कारासह विनयभंग, छेडछाडीच्या घटनाही वाढत आहेत. घराबाहेर असलेल्या तरुणींना कार्यालय, रस्ते, रेल्वे स्थानकांवरही असुरक्षित वाटते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे वाटत आहेत. कोपर्डी येथील बलात्कार पीडितेला अखेर न्याय मिळाल्याचा आनंद होत आहे. किमान यातून तरी काही गुन्हेगार धडा घेतील, असे वाटते.
- श्वेता जोशी, बदलापूर

बलात्कारासाठी
कडक कायदा करा!
मराठा मोर्चा आणि अनेक संस्था, संघटनांनी आवाज उठविल्यानंतर कोपर्डी प्रकरणाची झळ देशभर पोहोचली. अद्यापही देशभर महिला अत्याचारांच्या घटनांची नोंद रोज होत आहे. निकालास दिरंगाई झाल्याचे वाटते. त्यामुळे तत्काळ निकाल देणाºया कायद्याचा विचार व्हावा. अद्याप बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी देशात कडक कायदा नाही.
- नीता लांजेकर, अंनिस कार्यकर्त्या

कोपर्डी निकालाचे स्वागत करते. मात्र बलात्काराच्या घटना या वारंवार घडत असून, गुन्हेगारांना फाशी देऊन गुन्हे कमी होत नाहीत. कारण त्यामध्ये कायद्याचा धाक नसतो. म्हणूनच सरकारने शाळांमध्ये कायदा या विषयावर पाठ्यपुस्तकातून ज्ञान दिले पाहिजे. जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासण्याआधीच त्यांच्यात कायद्याची दहशत निर्माण होईल. शालेय पाठ्यपुस्तकात कायद्याचे ज्ञान देणारा विषय असावा, अशी मागणी सरकारकडे करणार आहोत. तेव्हाच मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होईल.
- कल्पना इनामदार, सामाजिक कार्यकर्त्या

वाईट प्रवृत्तींना चाप!
न्यायालयाने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांना काही प्रमाणात रोख लागेल. देशातील मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर, बाहेर काम करण्यावर घरातून, कुटुंबातून विविध बंधणे लादली जातात. मुलींच्या स्वातंत्र्यासाठी अशा समाजकंटकांवर पोलीस आणि प्रशासनाचा वचक असायला हवा.
- वर्षा काळे, गोरेगाव

शाळेत स्वसंरक्षणाचे धडे द्या!
दिल्लीतील निर्भया घटनेपाठोपाठ कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांनाही फाशी सुनावण्यात आल्याने, न्याय मिळाल्यासारखे वाटत आहे. परंतु मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय करत आहोत? हे तपासणेही आवश्यक आहे. शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत. शाळांमध्ये जसा झाशीच्या राणीचा इतिहास शिकवला जातो, तसे तिचे संरक्षणाचे धडेही शिकवायला हवेत. तरच मुली आणि महिला देशात सुरक्षित राहू शकतील. - प्रियांका कासारे, चेंबूर

Web Title:  Removing copperi 'she' satisfied!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.