वीजवाहिन्यांचे नूतनीकरण
By Admin | Published: June 26, 2014 11:18 PM2014-06-26T23:18:58+5:302014-06-26T23:18:58+5:30
भविष्यातील गरज ओळखून पनवेल परिसरातील वीजवितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
जालना : ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय गुरूवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयांवर आला़ मंत्रालयातील काम लवकर होईल पण तलाठी कार्यालयातील काम होईलच याची शाश्वती देता येत नाही, असा टोमणा लोकमत टीमशी बोलतांना संतप्त शेतकऱ्यांनी मारला. गुरूवारी ‘टीम लोकमत’ ने जिल्हयातील २९२ तलाठी सज्जांपैकी ६० सज्जांवर एकाच वेळी भेट देऊन पहाणी केली़ यातून पुढे आलेले वास्तव धक्कादायक आहे. तलाठी कार्यालयात हजर असतील या अपेक्षेने हातात कागदाचा पुडका घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयासमोर रेंगाळल्याचे चित्र दिसून आले. काहींनी उंबरे झिजवून दमलो... तरी देखील तलाठ्यांना पाझर फुटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. बहुतांशी तलाठ्याने एक दलाल सजावर ठेवलेला आहे़ साहेब मात्र, सतत फिरतीवर आहेत. परिणामी तलाठी कार्यालयाचे काम एका हेलपाट्यात झाले, असे म्हणारा एकही व्यक्ती शोधूनही सापडला नाही. याचा अनुभव गुरूवारी स्टींग आॅपरेशनमुळे निदर्शनास आला. एकाच वेळी जिल्ह्यातील तलाठी सज्जांवर जाऊन तलाठी कार्यालयाच्या ‘कारभाराची’ पाहणी केली़ यातून पुढे आलेले हे वास्तव.
(टीम लोकमत, जालना)
असे केले स्टींग
जिल्हयातील आठ तालुक्यातील प्रत्येकी ६० तलाठी कार्यालयाची निवड केली़ व सर्व तालुका प्रतिनिधी, वार्ताहरांनी गुरूवारी सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान निवडलेल्या तलाठी सज्जांवर जाऊन पहाणी केली़ निवडलेल्या नव्वद ते शंभर तलाठी सज्जांपैकी बहुतांशी तलाठी कार्यालये कार्यालयीन वेळेत बंद होती. तर काही कार्यालयांवर तलाठ्यांनी परस्पर नेमलेले दलालच मानेइतबारे कारभार पाहत असल्याचे आढळून आले. ग्रामस्थही दलालांनाच साहेब म्हणत त्यांच्याकडूनच कामे उरकतांना दिसत होते.
कुंभार पिंपळगावात पाच कार्यालयांना कुलूप
कुंभारपिंपळगाव : या गावात सहा तलाठी सज्जे आहेत. सज्जास्थानी कुंभारपिंपळगाव हे एकमेव, उर्वरित परिसरातील पाचही सज्जांची कार्यालये याच गावात आहेत. गुरूवारी दुपारी १२.३० ते २ या वेळेत या सहाही कार्यालयांमधून फेरफटका मारला. तेव्हा कुंभारपिंपळगाव येथील तलाठी व्ही.एम. जोगदंड यांच्या कार्यालयास कुलूप होते. मोबाईल बंद होता. कुक्कडगाव सज्जाचे एन.पी. बाळापुरे यांचे कार्यालय तीन दिवसांपासून बंद होते. धामणगाव, उक्कडगाव-गुंज, श्रीपत धामणगाव, कोठाळा व सिंदखेड या गावाच्या तलाठी कार्यालयांना कुलूप होते. राजाटाकळी व लिंबोणी सज्जांची येथील एकाच शटरमधील दोन्हीही कार्यालये उघडी होती. परंतु तलाठी बेपत्ता होते. दलालच ग्रामस्थांच्या कामात दंग होते. तलाठ्यांनी स्वाक्षऱ्या करून ठेवलेल्या कागदपत्रांवर नोंदीची कामे खुलेआम सुरू होती. या तलाठी कार्यालयात आठवड्यास किंवा महिन्यास एकदाच तलाठी भेटतात, अशी कुजबूज ग्रामस्थांत सुरू होती. गंमत म्हणजे धामणगाव व कुंभारपिंपळगाव तलाठी सज्जाचे कार्यालय एक महिन्यांपासून बंद असल्याची तसेच पारडगाव येथील कार्यालयाची पडझड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
माहोऱ्याचा कारभार दलालांच्या हातात
माहोरा - माहोरा परिसरात तीन तलाठी सज्जे आहेत. त्यात आसई व येवताचे तलाठी सज्जे गायब झाले आहेत तर माहोरा सज्जाचा कारभार दलालाच्या भरवश्यावर आहे. माहोरा येथील तलाठ्यांचा कारभार ग्रामंपचायतच्या एका खोलीतून चालतो. या कार्यालयाचा कारभार चालविण्यासाठी एक व्यक्ती नेमूण देण्यात आली आहे. तिच व्यक्ती कारभार पाहते. तलाठी आठ ते दहा दिवसाआड एकदा सज्जावर येतात. या तलाठ्यांकडे खासगाव या सज्जाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. सकाळी ११.३० वाजता भेट दिली असता साहेब गैरहजर होते. कार्यालयात रोजंदारीवर ठेवलेली व्यक्ती वाचनात दंग होती. दुपारी १२.१५ वा. येथून जवळच असलेल्या येवता येथील तलाठी सज्जाला भेट दिली तेव्हा तलाठी कार्यालय नसल्याचे निदर्शनास आले. येथील तलाठ्यांनी आपल्या सोयीसाठी माहोरा येथून कारभार सांभाळत असल्याची माहिती मिळाली.
घनसावंगी तालुक्यात
४१ सज्जे, २५ तलाठी...!
घनसावंगी : या तालुक्यात ११७ गावे ४१ तलाठी सज्जे आहेत. प्रत्यक्षात २५ तलाठीच कार्यरत आहेत. ३ तलाठी प्रतिनियुक्तीवर गेले. दोन तलाठी काही कारणांमुळे निलंबित आहेत. कार्यरत २५ तलाठी कधीच सज्जाच्या ठिकाणी राहत नाहीत. एका तलाठ्यावर किमान दोन सज्जांच्या कामाचा बोजा आहे. पण ‘तिकडे होतो....’ ‘इकडे होतो...’ अशी उत्तरे तलाठ्याकडून दिली जातात. या तलाठ्यांना स्वत:ची कार्यालये नाहीत. आठवडी बाजाराच्या दिवशी कोणाच्यातरी बैठकीत ठाण मांडून तलाठी कसबसे कामकाज उरकण्याचा प्रयत्न करीत असतात. या तालुक्यातील महसूल यंत्रणेअंतर्गत अनागोंदी या कारणांमुळेच मोठ्या प्रमाणात वाढत असून, प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर याची दखल घेणे गरजेचे आहे.
अशी आहे तलाठी सजांची स्थिती
तालुका सज्जेकार्यरत तलाठीरिक्त पदे
जालना ४६४४ ०२
भोकरदन ४८४० ०८
जाफराबाद २८२५ ०३
परतूर २८२५ ०३
मंठा २७०५
अंबड ४४३३ ११
घनसावंगी ४१२५ १६
एकूण २६२१९७ ४३
सरकारीऐवजी खाजगी जागांमधूनच कार्यालये
भोकरदन : या तालुक्यात ४८ सज्जे आहेत. त्यात ४० तलाठी आहेत. ८ जागा महिन्यानुमहिन्यांपासून रिक्त आहेत. विशेष म्हणजे ५ ठिकाणी शासकीय तलाठी कार्यालये अस्तित्वात असतानासुद्धा त्याऐवजी खाजगी किरायाच्या इमारतीत तलाठी कार्यालये कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
भोकरदन येथील महात्मा फुले चौकातील तलाठी कार्यालयात दुपारी १.३० ते २ च्या सुमारास भेट दिली असता कार्यालयास कुलूप होते. तलाठ्याशी संपर्क साधला तेव्हा ‘लॅपटॉप’ बंद असून, ते दुरूस्तीसाठी घेऊन आलो असल्याचा खुलासा त्यांनी केला. येथील तहसीलदारांच्या निवासस्थानाजवळ तलाठी कार्यालयाची इमारत आहे. दहा वर्षांपूर्वी त्या यासाठी वितरीत झाली.
गंमत म्हणजे या जागेत एक सेवानिवृत्त कर्मचारी आपला संसार थाटून बसला आहे. परिणामी खाजगी इमारतीत तलाठी कार्यालय कार्यरत आहे.
तालुक्यात सिपोरा बाजार, राजूर, पिंपळगाव रेणुकाई व पारध या चार ठिकाणी शासकीय तलाठी कार्यालये आहेत. परंतु, ही कार्यालये खाजगी इमारतीत कार्यरत आहेत. त्यामागील गौडबंगाल कळेनासे झाले आहे. तालुक्यातील बहुतांश सज्जांच्या ठिकाणी तलाठी वास्तव्यास नाहीत. भोकरदन किंवा जिल्हास्थानापासून ते अप-डाऊन करतात. त्यांचे पंटर मात्र सर्व दैनंदिन व्यवहार सांभाळतात. या तलाठी मित्रांवरच सरकारी यंत्रणेची सर्व दारोमदार अवलंबून आहे. तलाठी स्वाक्षऱ्यांपुरतेच उरले आहेत. या कार्यालयांमधून विविध युक्त्या-क्लृप्त्या अवलंबिल्या जातात. ग्रामस्थांकडून ओरड होऊ नये म्हणून धूर्तपणाही दाखविला जातो.
एकाच इमारतीत १० सज्जे
टेंभूर्णी /अकोला देव : टेंभूर्णी व कुंभारझरी या मंडळांतर्गत १० तलाठी सज्जांची कार्यालये टेंभूर्णीत आहेत. अकोला देव, देळेगव्हाण, डोणगाव, तपोवन गोधन, सावंगी, टेंभूर्णी, कुंभारझरी, सावरगाव म्हस्के, पापळ, सातेफळ व हिवरा काबली या दहा सज्जांतर्गत ३७ गावांचा यात समावेश आहे. तेही एका खाजगी इमारतीत. अकोला देव येथील तलाठी कार्यालयास भेट दिली तेव्हा तलाठी हजर होते. तर गुरूवारी सकाळी ११ वाजता टेंभूर्णी येथील शिवाजी चौकातील या कार्यालयास टेंभूर्णी व अकोलदेवच्या आमच्या प्रतिनिधींनी भेटी दिल्या. तेव्हा एक मंडळ अधिकारी व पापळ, डोणगाव, देळेगव्हाण, तपोवन गोंधन व टेंभूर्णी या सज्जांचे तलाठी हजर होते. काही कागदपत्रांवर या सर्वांनी लगबगीने सह्या केल्या. ‘तुम्ही कुठे जाताय?’ असे विचारले असता, मंडळ अधिकाऱ्यांनी ‘जाफराबादला जातो’ म्हणून काढता पाय घेतला. ते एका तलाठ्याच्या गाडीवर बसून निघून गेले. पाठोपाठ दुसऱ्या तलाठ्यानेही तेथून काढता पाय घेतला. अन्य सज्जांचे तलाठी कुठे आहेत, अशी विचारपूस केली असता, एक तलाठी रजेवर तर दुसरे तलाठी ‘टेंभूर्णीलाच असतील’, अशी उत्तरे मिळाली. त्यानंतर तेथील दलालच पांढरे कागदं काळे करण्यात व्यस्त होते. गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शेतकरी फेरफार नोंदी व अन्य कामांसाठी चकरा मारीत आहेत. परंतु, दलाल ‘अर्थपूर्ण’ चर्चा केल्याशिवाय कामे करीत नाहीत, हे वास्तव आहे.