Join us

सार्वजनिक उपक्रमातील उद्योगांना नवे रूप देऊ - अरविंद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 3:54 AM

देशातील काही सार्वजनिक उपक्रमातील उद्योग बंद किंवा तोट्यात असल्याचे मान्य करून ते म्हणाले, यातील काही उद्योगांनी चांगली कामगिरी केली आहे

सुरेश भुसारी नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक उपक्रमातील उद्योग देशासाठी पांढरा हत्ती नसून उत्पादन व रोजगार निर्मितीचे नवे केंद्र व्हावे, यासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जातील, असा विश्वास नवनियुक्त केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

प्रश्न : मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कामाची सुरुवात कशी झाली आहे?उत्तर : अवजड उद्योग खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मी विभागातील सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सार्वजनिक उपक्रम उद्योगांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यादृष्टीने माझे पुढील धोरण ठरविणार आहे. तसेच अधिकाऱ्यांनी खात्यातील सद्य:स्थितीबाबत सुचवलेले बदल आणि सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन.

प्रश्न : देशातील सध्याच्या सर्वजनिक उपक्रमांबद्दल काय सांगाल?देशात ‘भेल’सारखे उद्योग असताना सार्वजनिक उपक्रमातील इतर उद्योगांना तशी कामगिरी का करता आली नाही? ‘भेल’ ही देशातीलच नव्हेतर, जगामधील एक महत्त्वाची संस्था आहे. देशाच्या उद्योगाला ‘भेल’ने नवे मापदंड तयार केले आहेत. परंतु सार्वजनिक उपक्रमातील इतर उद्योगांना तशी कामगिरी करता आली नाही. माझ्या कार्यकाळात या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीन.

उद्योगांनी मर्यादित कोषातून बाहेर पडावेयासंदर्भात माझ्या काही संकल्पना आहेत. सार्वजनिक उपक्रमातील उद्योगांनी मर्यादित कोषातून बाहेर पडण्याची गरज आहे. या उद्योगांच्या मूळ संकल्पनेत अडकून न पडता, दुसरे उद्योग व कामे करता येतील काय याचा विचारही तेथील व्यवस्थापन मंडळाला करावा लागणार आहे. नव्या संकल्पनांसह या उद्योगांना नवी वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका नव्या सरकारची राहणार आहे.

अहवाल सादर करण्याचे निर्देशदेशातील काही सार्वजनिक उपक्रमातील उद्योग बंद किंवा तोट्यात असल्याचे मान्य करून ते म्हणाले, यातील काही उद्योगांनी चांगली कामगिरी केली आहे. या उद्योगांना नवसंजीवनी देताना निश्चितपणे वर्गीकरण करावे लागणार आहे. काही बदल करून सुरू होणाºया उद्योगांना आधी प्राधान्य दिले जाईल. या उद्योगांच्या व्यवस्थापक मंडळाने एक अहवाल देण्याचे निर्देश सचिवांना दिले आहेत. येत्या सहा महिन्यांत किती उद्योग सुरू होऊ शकतील याचा अहवाल मागितल्याचे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :अरविंद सावंतशिवसेना