Join us

अभ्युदय बँकेच्या भिवंडी शाखेचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभ्युदय बँकेच्या भिवंडी शाखेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरणाचा शुभारंभ सोमवारी भिवंडी येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभ्युदय बँकेच्या भिवंडी शाखेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरणाचा शुभारंभ सोमवारी भिवंडी येथील गोपाळ नगरमध्ये बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट व व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ सालियन उपस्थित होते. या शाखेत सकाळी ९ ते दुपारी २.३०पर्यंत सोमवार ते शनिवार (बँकेच्या सुट्टी वगळता) नूतनीकरणाच्या जागेवर ग्राहकांना त्यांचे बँकिंग व्यवहार सोयीस्करपणे करता येतील. बँक आधुनिक व उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १७ हजार ३०० कोटींहून अधिक आहे. १११ शाखा या महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कार्यरत आहेत. अभ्युदय बँक सेवा युपीआयमार्फत २४ तास ७ दिवस आरटीजीएस/एनईएफटी देते. बँक शुभंकरोती - ३ योजनेंतर्गत १८ महिन्यांच्या ठेवीवर ७ टक्के व्याज देते. या कालावधीची मुदत ३० जून २०२१ आहे. बँकेने गृहनिर्माण व सुवर्ण कर्जावरील व्याजदरात आणखी घट केली आहे.

-----------

अभ्युदय बँक भिवंडी शाखेचे नूतनीकरणप्रसंगी डावीकडून संचालक नित्यानंद प्रभू, अध्यक्ष संदीप घनदाट, मानद अध्यक्ष सीताराम घनदाट व व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ सालियन उपस्थित होते.