कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन

By मनोहर कुंभेजकर | Published: April 7, 2023 02:55 PM2023-04-07T14:55:52+5:302023-04-07T14:56:23+5:30

राम नाईक म्हणाले की, कुष्ठ पीडितांना सार्वजनिक रित्या अनेक अडचणी समोर जावे लागते. आपण उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन करून कुष्ठ पीडितांच्या आवास योजनेचे काम झाले.

Renovation of Social Welfare Center of Leprosy Colony inaugurated by Ram Naik | कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन

कुष्ठ पीडित वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण, राम नाईक यांच्या हस्ते उदघाटन

googlenewsNext

मुंबई : भाजप स्थापना दिवसाचे औचित्य साधून दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या आमदार निधीतून दहिसर पूर्व संजय नगर येथील कुष्ठपिडीत वसाहतीच्या समाज कल्याण केंद्राचे नूतनीकरण उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे या वास्तूचे निर्माण पूर्वी आमदार असताना राम नाईक यांनी केले होते.

यावेळी राम नाईक म्हणाले की, कुष्ठ पीडितांना सार्वजनिक रित्या अनेक अडचणी समोर जावे लागते. आपण उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन करून कुष्ठ पीडितांच्या आवास योजनेचे काम झाले. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना आपण २०१९  मध्ये निवेदन केले होते आणि त्यांनी सदर आवास योजना राबवण्याचे मान्य केले होते. परंतू मधल्या काळात सरकार बदलल्याने सदर योजनेला खीळ बसली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुष्ठ पीडितांच्या आवास योजना साकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर दिव्यांग नागरिकांना जसे नोकरी आरक्षण मिळते तसे  कुष्ठ पीडितांना सुद्धा मिळाले पाहिजे असे त्यांनी केले.

पनवेल महानगरपालिका कुष्ठरोग्यांना  ४ हजार अनुदान देते तर मुंबई महानगर पालिका त्यांना देत असलेल्या  २,५०० रुपयांच्या अनुदानात वाढ करण्यासंदर्भात निवेदन कुष्ठपीडितांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  राम नाईक यांना दिले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, भाजप नेते अँड.जयप्रकाश मिश्रा, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांची भाषणे झाली. 

महाराष्ट्र कुष्ठ पीड़ित संघटन अध्यक्ष भूपाल फरगोने संजय नगर रहिवासी संघ अध्यक्ष सफी शेख , श्रीकांत पांडे,नीलाबेन सोनी, दहिसर भाजप अध्यक्ष अरविंद यादव, आरोग्य आघाडी अध्यक्ष अशोक शाह, माजी नगरसेवक विद्यार्थी सिंह, जगदीश ओझा, हरीश छेडा, जितेंद्र पटेल तसेच कुष्ठ पीडित संघटनचे पदाधिकारी, संजय नगर रहिवासी संघाचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शास्त्री यांनी केले.

Web Title: Renovation of Social Welfare Center of Leprosy Colony inaugurated by Ram Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई