Join us  

उत्पन्नासाठी ‘बेस्ट’ आगार भाड्याने

By admin | Published: July 09, 2017 2:35 AM

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला तूर्तास पालिकेकडूनही दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे बेस्ट समितीने आपल्याच मालमत्तांतून उत्पन्न

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला तूर्तास पालिकेकडूनही दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे बेस्ट समितीने आपल्याच मालमत्तांतून उत्पन्न मिळवण्याची योजना आखली आहे. बस आगार भाड्याने देण्यापासून याची सुरुवात झाली आहे. देवनार येथील शिवाजीनगर बस आगाराची जागा भाड्याने दिल्याने बेस्टला चार कोटी रुपये मिळणार आहेत.बेस्ट उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी पालिकेने तयारी दाखविली. मात्र यासाठी कृती आराखडा सादर करण्याची अट पालिकेने घातली. हा कृती आराखडा वादात सापडला असून, चर्चेव्यतिरिक्त कोणतीच मदत बेस्टच्या पदरात अद्याप पडलेली नाही. परंतु दैनंदिन खर्चासाठीही पैशांची तजवीज करणे बेस्टसाठी अडचणीचे ठरूलागले आहे. त्यामुळे बस आगाराची जागा भाड्याने देण्याचा निर्णय बेस्ट समितीने घेतला आहे. त्यानुसार घाटकोपर ते चेंबूर जोडरस्त्यापर्यंतच्या उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराला कास्टिंग गार्डसाठी शिवाजीनगर आगाराची जागा ३० महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाणार आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच सोमवारी पाहणी दौरा आयोजित करण्याचे निश्चित करून बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.अशी पडणार तिजोरीत भरशिवाजीनगर येथील ७९ हजार ९८६ चौरस मीटरच्या भूखंडावर आगार आहे. कर्मचारी वसाहत वगळल्यास येथे २६ हजार २९ चौरस मीटर जागा रिक्त पडून आहे. महापालिकेकडून घाटकोपर ते चेंबूर जोडरस्त्यापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. पालिकेने या उड्डाणपुलाचे बांधकाम मेसर्स जेएमसी लिमिटेड या कंपनीकडे सोपवले आहे. या कंपनीने बांधकामासाठी कास्टिंग गार्ड म्हणून ही जागा भाडे तत्त्वावर देण्याची मागणी केली. बेस्टला ४ कोटी २१ लाख रुपये भाडे मिळणार आहे.