Join us

भाडे थकविणारे बिल्डर एसआरएच्या ‘रडारवर’; ऑनलाइन तक्रार करा, झोपडीधारकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:36 AM

पुनर्वसन योजनेंतर्गत नव्याने इमारत बांधण्यासाठी झोपड्या पाडल्यानंतर झोपडीधारकांना पुनर्विकासादरम्यान बिल्डरकडून वेळच्यावेळी भाडे मिळणे अपेक्षित असते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर, उपनगरात सुरू असलेल्या पुनर्विकासादरम्यान अनेक बिल्डरांनी झोपडीधारकांंचे कोट्यवधीचे भाडे थकविले आहे. हे याची तक्रार करता यावी म्हणून त्यांना वांद्रे येथील मुख्यालयात हेलपाटे मारावे लागतात. यावर उपाय म्हणून एसआरएने ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे ठरविले असून, यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर झोपडीधारकांना बिल्डरची तक्रार करता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने फसवणुकीला आळा बसणार आहे.

पुनर्वसन योजनेंतर्गत नव्याने इमारत बांधण्यासाठी झोपड्या पाडल्यानंतर झोपडीधारकांना पुनर्विकासादरम्यान बिल्डरकडून वेळच्यावेळी भाडे मिळणे अपेक्षित असते. मात्र, बिल्डरांकडून झोपडीधारकांना भाडे दिले जात नाही. अशावेळी या झोपडीधारकांना निवेदन किंवा तक्रार दाखल करावी लागते. तक्रार दाखल केल्यानंतरही मुख्यालयामध्ये शंभर हेलपाटे घालावे लागतात. हे सगळे करताना त्यांचा वेळ वाया जातो. एसआरएकडून बिल्डरांना थकबाकीच्या नोटीसही दिल्या जातात. 

प्राधिकरणाने केली एजन्सीची नियुक्ती   आता यावर उपाय म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन करायचे ठरवले आहे.   यासाठी प्राधिकरणाने एका एजन्सीची नियुक्ती केली आहे.   नियुक्त एजन्सीच्या माध्यमातून हे काम ऑनलाइन केले जाणार आहे.   एखाद्या झोपडीधारकाचे भाडे थकले तर त्याने ऑनलाइन त्याच्याच नावावर तक्रार करणे अपेक्षित आहे.   ही तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल.   तसेच ऑनलाइन प्रक्रिया सुरू असताना भाडे थकविलेल्या बिल्डरला नोटीस देण्यापासून झोपडीधारकाला माहिती देण्याचे काम ऑनलाइन केले जाईल. प्रकरणाचा लागलेला निकालही कळविला जाईल.  झोपडपटटी पुनर्वसन योजनेमध्ये देण्यात आलेल्या घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. देण्यात आलेल्या मूळ पात्र झोपडीधारकाखेरिज घरामध्ये अन्य व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाते.

लॉटरीही ऑनलाइनपुनर्वसन प्रक्रियेत लॉटरी काढण्याचे कामदेखील आता ऑनलाइन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व गोष्टी रेकॉर्डवर येतील.

 भ्रष्टाचाराला आळा सगळी प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने प्राधिकरणाकडे प्रत्येक गोष्टीची नोंद राहील. झोपडीधारकांची फसवणूक होणार नाही. भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.

१,२०० जणांची लॉटरीबाराशे लोकांची लॉटरी ऑनलाइन काढण्यात आली असून, पुनर्वसनादरम्यान घरांची लॉटरी प्रक्रिया ऑनलाइनच राहील, अशी माहिती एसआरएच्या अधिकाऱ्याने दिली.