मुंबईराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर आज अनेक खुलासे होत आहेत. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडेंना पाठिंबा देत तक्रारदार महिलेविरोधात थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रेणू शर्माकडून याआधी ब्लकमेलिंग करण्यात आल्याचे आरोप केले आहेत. आता रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.
आमदार प्रतास सरनाईकांच्या पार्टीत हजर होत्या रेणू शर्मा"मी पोलिसांत तक्रार केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप केले जाऊ लागले आहेत. मी कोणत्याही हनीट्रॅपचा भाग नव्हते. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते", असं ट्विट रेणू शर्मा यांनी केलं आहे.
धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...
रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप फेटाळलेरेणू शर्मा यांनी मला देखील रिलेशनशिपच्या हनीट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केला आहे. त्यावर रेणू शर्मा यांनी हेगडेंचे आरोप बोगस असल्याचं म्हटलं आहे. "कृष्णा हेगडे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे", असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हालचालींना वेग! विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाकृष्णा हेगडे यांनी आज काय केलं?भाजप नेते कृष्णा हेडगे यांनी आज स्वत:च मुंबई पोलिसांना पत्र लिहून धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तक्रार महिलेविरोधातच तक्रार केली आहे. "२०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. तसेच सातत्याने मला रिलेशनशीपसाठी बळजबरी करत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणं सुरूच ठेवलं होतं. मी बाहेरुन केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे अनेकांना फसविल्याची माहिती मला कळली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करावी", असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्षमुंडे यांच्यावरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार यांनी आज त्याबाबत सूचक विधानही केलं आहे. "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल", असं शरद पवार म्हणाले आहेत.