Join us

राज्यात अवयवदान प्रत्यारोपण समितीची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:09 AM

कैलाश जवादे यांची अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर नियुक्तीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारच्या मानवी अवयव प्रत्यारोपण सल्लागार ...

कैलाश जवादे यांची अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीवर नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारच्या मानवी अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची नुकतीच फेररचना झाली असून या समितीवर सदस्य म्हणून नामवंत प्रत्यारोपण तज्ज्ञ व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ‘दोस्त (Dhanwatari’s Organisation for Socio-health Transformation)’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक डॉ. कैलाश जवादे यांची नियुक्ती करण्यात आली.

३० एप्रिल २०२१ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची फेररचना केली आहे. या समितीत राज्यभरातील प्रत्यारोपणाशी निगडित १४ तज्ज्ञ सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. तसेच संचालक, आरोग्य सेवा यांची सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. जवादे यांनी एम.बी.बी.एस., एम.एस. असून अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण त्यांनी कोरिया व तैवान या देशातून घेतले आहे. आशिया खंडातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण करणारे डॉ. चाऊलांग चेन यांच्या मर्गदर्शनाखाली यकृत प्रत्यारोपणाचे धडे गिरवले आहेत. त्यांनी आजवर दिल्लीतील अपोलो रुग्णालय, चेन्नईतील चेट्टीनाड तसेच मुंबईतील केईएम रुग्णालयात काम केले आहे. सध्या ते नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात हिपॅटोबिलीयरी सर्जरी आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सा पथक प्रमुख (युनिट हेड) म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दोन दशके कामाचा त्यांना अनुभव असून प्रत्यारोपण तज्ज्ञ म्हणूनही त्यांना भारतात ओळखले जाते. प्रत्यारोपण क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी केलेल्या काम तसेच संशोधन अहवाल सादर झाले आहेत. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम व्हावे, हे त्यांचे ध्येय असून विविध देशांमधील अशा कामांचा त्यांनी सखोल अभ्यासही केला आहे.

.........................................