रुग्णालय लवकर दुरुस्त करा, तोपर्यंत अन्यत्र शिफ्ट करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 06:19 AM2018-12-19T06:19:09+5:302018-12-19T06:19:49+5:30

कर्मचाऱ्यांची मागणी : कामगार रुग्णालय प्रशासनाविरोधात केले आंदोलन

Repair the hospital early, then shift it elsewhere | रुग्णालय लवकर दुरुस्त करा, तोपर्यंत अन्यत्र शिफ्ट करा

रुग्णालय लवकर दुरुस्त करा, तोपर्यंत अन्यत्र शिफ्ट करा

Next

मुंबई : कामगार रुग्णालयामध्ये ५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे काही दिवस रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, रुग्णालय बंद ठेवले, तर कर्मचाºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे कामगार रुग्णालय लवकर दुरुस्त करा आणि तोपर्यंत वाशी/कांदिवली येथे शिफ्ट करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या तसेच अन्य मागण्यांसाठी कर्मचाºयांनी मंगळवारी रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

अंधेरीतील कामगार (ईएसआयसी) रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी आग लागली. रुग्णालयात आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाविरुद्ध आंदोलन पुकारले होते. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी रुग्णालयाच्या आवारात बसले होते. रुग्णालयात असलेली सोयी-सुविधांची वानवा, अग्निसुरक्षेविषयी साहित्यांचा अभाव इत्यादी अनेक समस्यांविरुद्ध कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला. कामगारांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. रुग्णालयाची इमारत बाहेरून चांगली दिसते. मात्र, आतून रुग्णालयाची अवस्था अत्यंत गंभीर आहे, रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे, असा आरोप या वेळी कर्मचाºयांनी केला. रुग्णालय लवकर दुरुस्त करा तोपर्यंत अन्यत्र शिफ्ट करा, अशी मागणीही कर्मचाºयांकडून करण्यात आली.

रुग्णालयात लागलेल्या आगीत जीव गमावावा लागलेल्या आठ जणांना रुग्णालयाच्या आवारात श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारच्या दुर्घटनेनंतर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी हॉस्पिटलला भेट दिली. या वेळी कर्मचाºयांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच रुग्णालय लवकर दुरुस्त करण्याची, तोपर्यंत कर्मचाºयांना वाशी/कांदिवली येथे शिफ्ट करण्याची मागणीही या वेळी लावून धरण्यात आली.

एनबीसीसी कंपनीविरोधात घोषणाबाजी
रुग्णालय प्रशासनाविरुद्ध मंगळवारी कर्मचाºयांनी आंदोलन केले. डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी रुग्णालयाच्या आवारात बसले होते. कामगारांनी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. एनबीसीसीद्वारे रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे. कुठलीच सुविधा आग नियंत्रणासाठी विकासकाने उपलब्ध करून दिली नसल्याचा निषेधही या वेळी करण्यात आला.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
च्जनतेचा उद्रेक होऊ नये किंवा कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कामगार रुग्णालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी मंगळवारी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रुग्णालयाच्या आवारात केवळ डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाºयांना प्रवेश दिला जात होता.

गृहराज्यमंत्र्यांनी भेट नाकारली
कामगार रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी दुपारी रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाºयांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, गृहराज्यमंत्र्यांनी कर्मचाºयांशी संवाद साधला नाही. त्यामुळे कर्मचाºयांचे पुढे काय होणार, असा प्रश्न भेडसावत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.

कामगार रुग्णालयाच्या आगीची न्यायालयीन चौकशी करा!
राष्ट्रीय मिल मजदूर संघ : प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध


मुंबई : अंधेरी येथील कामगार रुग्णालयामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून ८ जणांचा मृत्यू झाला; ही दुर्घटना म्हणजे केंद्र, राज्य सरकार आणि ईएसआय कॉर्पोरेशनच्या दुर्लक्षित धोरणाचा कळस आहे, अशी टीका राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली, तसेच कामगारांच्या सुरक्षेकडे पाहण्याच्या या निष्काळजी वृत्तीचा निषेध करत, संघटनेने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.
संघाचे अध्यक्ष सचिन अहिर म्हणाले की, कामगारांची वर्गणी आणि नवी दिल्ली, कॉर्पोरेशनच्या निधीवर चालणाºया मुंबईतील ई. एस. आयच्या गांधी रुग्णालयासह अन्य सहा रुग्णालयांच्या दुर्दशेकडे राष्ट्रीय मिल मजदूर संघाने वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधले.
राज्य सरकार निधी देत नसले, तरी या रुग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देणे, राज्य सरकारची नैतिक जबाबदारी होती. ई. एस. आय. योजना लागू असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णालयात मिळत नाहीत. मोठ्या रोगांवर उपचार करणेही बंद झाले आहे. रुग्णालयांच्या देखभालीकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रश्नांकडे संघटनेच्या शिष्टमंडळाने गांधी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचे नुकतेच लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधल्याचे संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.
ते म्हणाले की, १९४८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केवळ कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ही कामगार राज्य विमा योजना जन्माला घातली, पण सरकारने दुर्लक्ष करून ती पायदळी तुडविली आहे. कॉर्पोरेशन, नवी दिल्लीने निधी पुरवठ्याबाबत आधीच आखडता हात घेतला आहे. रुग्णालयांच्या योजनाही कमी करण्यात आल्या आहेत. या एकूण पार्श्वभूमीवर अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला भीषण आग लागली. याबाबत कामगार वर्गाकडून संशय व्यक्त केला जात आहे. म्हणून सरकारने न्यायालयालयीन चौकशी करावी, अशी मागणी मोहिते यांनी केली.

केंद्र सरकार करणार आगीची चौकशी; केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्र्यांची माहिती, आज विशेष बैठकीचे आयोजन


मुंबई : केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी कामगार रुग्णालय आग प्रकरणी बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे, अशी माहिती खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी मंगळवारी सायंकाळी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी कीर्तीकर यांनी मृतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी मंत्र्यांकडे केली. गंगवार यावेळी म्हणाले की, राज्य शासन आगीची चौकशी करेल. त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, येथील रुग्णालयात वास्तव्य करत असलेल्या कर्मचाºयांनी त्यांना घेराव घालून आगीस दिल्लीचे नॅशनल बिल्डिंग कॉन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) व कंत्राटदार सुप्रीम जबाबदार असल्याचा आरोप करत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: Repair the hospital early, then shift it elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.