Join us

नाट्यगृहांची दुरुस्ती करून पुरेशा सुविधा द्या - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:19 AM

राज्यातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोक कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाºया सुखसुविधा या विषयासंदर्भात बैठक पार पडली,

मुंबई : मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून नाट्यगृहाची योग्य प्रकारे देखभाल दुरुस्ती होत आहे. या धर्तीवर अथवा वेगळ्या पद्धतीने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील नाट्यगृहांची दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी शुक्रवारी संबंधित सर्व महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सिनेकलावंत, रंगमंच कलावंत आणि लोक कलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाºया सुखसुविधा या विषयासंदर्भात बैठक पार पडली, त्यावेळी नीलम गोºहे बोलत होत्या. नाट्यगृहातील सुखसुविधा चांगल्या दर्जाच्या असाव्यात. यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्ती करावी. सर्व नाट्यगृहातील स्वच्छतागृहांत पाण्याची सोय करावी, तसेच नाट्यगृहातील खिडक्या, जाळ्या, दारे, कचरापेटी, फरशी दुरुस्ती करून घ्यावेत. कलाकारांच्या कपडे बदलण्याच्या खोल्या स्वच्छ व सुरक्षित असाव्यात व याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश उपसभापती यांनी दिले. नाट्यगृहात आपत्कालीन स्थितीत एखादी समस्या निर्माण झाली असल्यास अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक नाट्यगृहात दर्शनी भागात लावावा, असे निर्देश देण्यात आले. सोशल मीडियावर किंवा मनपाच्या संकेतस्थळावर सर्व मनपांनी नाट्यगृहातील सोईसुविधांची माहिती अपलोड करावी. आवश्यक दुरुस्तीनंतरचे फोटो अपलोड करावेत. मनपांनी नाट्यगृह दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक तिथे महानगरपालिकेच्या सदस्यांची समिती स्थापन करावी. यामध्ये पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक कलाकार यांना प्रतिनिधित्व द्यावे. नाट्यगृहामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि रवींद्र नाट्यमंदिर या नाट्यगृहाबाबतचा अहवाल सांस्कृतिक विभागाने सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. 

टॅग्स :मुंबईनीलम गो-हे