Join us

४०–२०० अँम्पियरचे जुने व नादुरुस्त झालेले वीज मीटर बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 4:21 PM

भांडूप परिमंडलात अधिकाऱ्यासमवेत घेतलेल्या बैठकीत निर्देश.

मुंबई : कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करता, वीज बिलाची थकबाकी वसुल करा. तसेच, ४०–२०० अँम्पियरचे जुने व नादुरुस्त झालेले वीज मीटर बदलण्यात यावे. २० के डब्ल्यूच्या वरती भार असणाऱ्या ग्राहकांचे योग्य पद्धतीने रीडिंग घ्या, असे निर्देश महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले. भांडूप परिमंडलात अधिकाऱ्यासमवेत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे, वाशी व पेण या तिन्ही मंडल कार्यालयातील वसुली तसेच इतर महत्वाच्या कामाचा आढावा घेतला.

उच्चदाब तसेच घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या वीजबिल वसुलीबाबत आढावा घेण्यात आला. थकबाकी असलेली रक्कम वसूल करण्यासाठी अभियंत्यांनी  ग्राहकांच्या सोसायटी मध्ये जाऊन वीज बिलाबाबत माहिती द्यावी. वीज बिल भरण्यासाठी आग्रह करावे. महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्यांनी चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी तत्पर राहावे. ग्राहकांच्या तक्रारींचे  निवारण करावे. त्यांना नवीन वीज जोडणी  वेळेत होईल याची दक्षता घ्यावी. एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत असलेल्या ग्राहकांच्या वीज देयकाची थकबाकी वसूल करतांना एकही ग्राहकाचा  वीजपुरवठा खंडित न करता, १०० टक्के वसुली करण्याचे उद्धिष्ट बैठकीत देण्यात आले. 

टॅग्स :महावितरणमुंबईवीजमहाराष्ट्र