आरटीओतली बदली अर्थकारणाच्या ‘गिअर’वर?, पदे रिक्त असतानाही बढतीला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:38 AM2020-07-13T02:38:13+5:302020-07-13T06:28:14+5:30
आरटीओत डेप्युटी आरटीओ आणि असिस्टंट आरटीओ यांच्या पदोन्नतीची यादी तयार आहे. त्यापैकी काही जणांना डेप्युटी आरटीओपदी बढती मिळाली. परंतु, ते निवृत्तीच्या टप्प्यावर असून काही जण महिनाभरात निवृत्त होतील.
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी पदोन्नतीची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, या अधिकाºयांनी अर्थकारणाचा ‘गिअर’ टाकल्याशिवाय ही बढती
आणि बदली त्यांच्या पदरी पडत नसल्याचा गंभीर आरोप या विभागातील अधिकाºयांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काही अधिकाºयांना पदोन्नतीच्या प्रतीक्षेतच निवृत्ती स्वीकारावी लागल्याचेही सांगण्यात आले.
आरटीओ अधिकाºयांनी एका ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नियमानुसार त्यांची बदली होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ही मुदत उलटून गेल्यानंतरही अनेक अधिकाºयांची बदलीच केली जात नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्याचा आरोप असून वर्धा येथे कार्यरत असलेला एक अधिकारी हे बदली-बढतीचे रॅकेट चालवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्येक पोस्टचा दर ठरलेला असून हा अधिकारी दर मंगळवार किंवा बुधवारी मुंबईत दाखल होत हे ‘व्यवहार’ करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनच्या काळात कामाचे ठिकाण सोडून अन्य ठिकाणी गेले म्हणून त्यांच्यावर कारवाईचा देखावा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र या अधिकाºयावर वरिष्ठांचे कृपाछत्र असल्याचे सांगत या कार्यपद्धतीबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आरटीओत डेप्युटी आरटीओ आणि असिस्टंट आरटीओ यांच्या पदोन्नतीची यादी तयार आहे. त्यापैकी काही जणांना डेप्युटी आरटीओपदी बढती मिळाली. परंतु, ते निवृत्तीच्या टप्प्यावर असून काही जण महिनाभरात निवृत्त होतील. उर्वरित अधिकाºयांच्या बढतीसाठी अर्थपूर्ण व्यवहारांची अपेक्षा वरिष्ठांकडून केली जात असल्याचे प्रतीक्षा यादीतल्या काही अधिकाºयांचे म्हणणे आहे. ही मागणी पूर्ण न करू शकलेल्या काही अधिकाºयांना पदोन्नती न घेताच निवृत्ती पत्करावी लागल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.
पदोन्नती कॅडरनुसार हवी
- नियमानुसार आणि योग्य वेळी बढती न देण्याची कार्यपद्धती अधिकाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. पोलीस किंवा सैन्य दलांप्रमाणे आरटीओतली पदोन्नती कॅडरबेस असावी.
- एकदा अधिकारी निवृत्त होण्यापूर्वी त्याच्या पदांची निश्चिती व्हावी. त्यामुळे हक्काची पदोन्नती न मिळता निवृत्ती ओढावणार नाही, असे मत आरटीओच्या वादग्रस्त कारभाराचा फटका बसलेल्या निवृत्त अधिकाºयाने व्यक्त केला.
लवकरच बदली, बढतीचे आदेश
या आरोपांबाबत परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे
त्यांनी सांगितले. तसेच, पदोन्नतीच्या यादीनुसार लवकरच
बदली आणि बढतीचे आदेश जारी केले जातील, असा दावाही त्यांनी केला.