मुंबई : मुंबईच्या विकासात ऐतिहासिक महत्त्व आणि संदर्भ असलेले ‘मैलाचे दगड’ काँक्रीटच्या जंगलात जमिनीखाली गाडले गेले आहेत. या दगडांचे जतन करण्याची मागणी जोर धरत होती. त्यानुसार या मैलांच्या दगडांना पुनर्स्थापित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे परळ परिसरात दोनशे वर्षे जुन्या व सुशोभीकरणासह पुनर्स्थापित करण्यात आलेल्या मैलाच्या दगडाचे अनावरणपुरातन वारसा समितीचे अध्यक्ष रामनाथ झा यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.परळमधील डॉ. एस. एस. राव मार्गावर अतिक्रमणे हटविण्यासह रस्ता व पदपथ दुरुस्तीचेही काम सुरू होते. याच दरम्यान महापालिकेच्या पथकाला पदपथामध्ये अर्धवट गाडला गेलेला मैलाचा दगड सापडला. हा दगड सुमारे दोनशे वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. १८१८ ते १८३६च्या दरम्यान बसविण्यात आला होता. याच परिसरातील जुन्या गव्हर्नर हाउसजवळ असणाºया या मैलाच्या दगडावर रोमन लिपीमध्ये ‘पाच’ हा आकडा लिहिला आहे. ज्याचा अर्थ सेंट थॉमस कॅथेड्रलपासून या मैलाच्या दगडाचे अंतर हे पाच मैल (सुमारे ८.०५ कि.मी.) एवढे आहे.या ऐतिहासिक दगडाचे महत्त्व लक्षात घेऊन महापालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने या मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना व आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.हा दगड रात्रीदेखील ठळकपणे दिसावा, यासाठी या दगडावरती सौरऊर्जेने प्रकाशमान होणारा दिवा बसविण्यात आला आहे. या पाचव्या मैलाच्या दगडाच्या बाजूला त्याची माहिती देणारा शिलालेखही बसविण्यात आला आहे, अशी माहिती एफ-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.मैलाचादगड म्हणजे काय?च्दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसवलेला दगड म्हणजे ‘मैलाचा दगड’ होय.च्ब्रिटिश काळात असे दहाहून अधिक मैलाचे दगड कुलाबा ते दादर या शहर भागांत बसवण्यात आले होते.च्ब्रिटिश काळातील हे दगड कालांतराने जमिनीखाली गाडले गेले. अतिक्रमणावर कारवाई सुरू असताना अनेक वेळा अशा दगडांचा शोध लागला आहे.च्असे सात ते आठ दगड असतील, ज्यावर आता दुकाने उभी राहिली आहेत.
मैलाच्या दगडाची पुनर्स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 6:32 AM