Join us  

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाजवळ कोसळलेल्या झाडाचं पुनर्रोपन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 7:37 PM

Balasaheb Thackeray: सदर झाडावर लावलेल्या फलकानुसार सदर झाड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले होते.

मुंबईबाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील झाड पडल्याबाबत या कार्यालयास माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रात्रपाळीत नियुक्त पर्यवेक्षकामार्फत सदर ठिकाणची पाहणी केली असता सदर ठिकाणचे गुलमोहर जातीचे अंदाजे ५' ते ६' घेर असलेले झाड मैदानाकडील बाजूस लगतच्या संरक्षक जाळ्या तोडून पडल्याचे निदर्शनास आले. सदर झाडावर लावलेल्या फलकानुसार सदर झाड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले होते. यास्तव रात्रपाळीत असलेल्या कामगारांमार्फत सदर झाडाच्या मैदानात पडलेल्या फांद्या कापण्यात आल्या. सकाळी सहाय्यक आयुक्त 'जी/उत्तर' विभाग व उप उद्यान अधिक्षक परि-२ यांच्या मार्गदर्शनानुसार सदर झाड पुनर्रोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उद्यानातील मैदानालगतची उत्तर दिशेच्या कोपर्‍यातील जागा त्याकरिता निवडण्यात आली. त्यानुसार सदर जागेबाबत सहाय्यक आयुक्त जी/उत्तर विभाग व उप उद्यान अधिक्षक परि-२ यांना माहिती देण्यात आली. प्रस्तावित जागी पाण्याचे पाइप व विद्युत केबल असल्याने परिरक्षण विभाग व दुय्यम अभियंता (विद्युत) यांचेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात आली.  प्रस्तावित ठिकाणी कामगारांच्या सहाय्याने खड्डा तयार करण्यात आला. पडलेले झाड हायड्राच्या सहाय्याने उचलून त्याच्या मुळांशी खतयुक्त मातीचा लेप देवून तसेच खड्ड्यातील मातीत मूळ संप्रेरक (Root Hormone) व खत मिसळून झाड नव्याने बनविलेल्या खड्ड्यात लावण्यात आले. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या संरक्षक जाळ्या(Grill), लाद्या, पाण्याचे पाइप, विद्युत केबल यांचे सदर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. उद्यान खाते जी उत्तर यांच्यामार्फत परिरक्षण व विद्युत विभाग यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त जी/उत्तर व उद्यान अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर झाड पुनर्रोपित करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेमुंबई