दहिसरमध्ये उभारली राम मंदिराची प्रतिकृती; राज्यभरात महाआरत्यांद्वारे करणार घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:54 AM2018-11-24T05:54:09+5:302018-11-24T05:54:40+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराची ४० फुटी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराची ४० फुटी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तर विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरतीपूर्वी साडेपाच वाजता श्रीराम मंदिर निर्मितीसाठी महायज्ञ करण्यात येणार आहे.
मुंबईत ठिकठिकाणी होणाºया महाआरत्यांमध्ये २२७ शिवसेना शाखांमधून हजारो शिवसैनिक सहभागी होणार असून, महाआरतीद्वारे घंटानाद करून श्रीरामाचा जल्लोष करणार आहेत. वातावरणनिर्मिती करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी मोठे कटआउट, होर्डिंग्ज, बाइक रॅली, मिरवणुका, महायज्ञ आदींचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाआरत्या पार पडणार आहेत.
दरम्यान, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जितेंद्र जानावळे यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावर ८०० फुटी मोठे बॅनर लावले असून, पंचवीस हजार स्टिकर्सचे रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी वाहनांना वाटप केले आहे.