ईडीने नाेंदविला नागपुरातील वकिलाचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:14+5:302021-06-29T04:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या नागपुरातील एका वकिलाचा सक्तवसुली संचालनालयाकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या नागपुरातील एका वकिलाचा सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) साेमवारी जबाब नोंदविण्यात आला. मंगळवार, २९ जून राेजी देशमुख यांना चौकशीसाठी पाचारण केल्याच्या पार्श्वभूमीवर साेमवारी घेण्यात आलेला जबाब महत्त्वपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मनी लाॅंड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल करावा, असा अर्ज नागपुरातील ॲड. तरुण परमार यांनी ईडीकडे केला होता. त्यानुसार त्यांना साेमवारी जबाब नोंदविण्यासाठी बाेलावण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास परमार बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्याकडून तक्रारीला पूरक ठरणारी संबंधित कागदपत्रे परमार यांनी अधिकाऱ्यांना सादर केली आहेत. मंगळवारी देशमुख चौकशीला हजर राहिल्यास त्यांना त्याअनुषंगाने विचारणा केली जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
..................................................................